तुमचं वजन वाढलंय? तर ही बीतमी वाचाच! कारण...

साम टीव्ही
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020
  • सावधान ! तुमचं वजन वाढलंय?
  • 'वर्क फ्रॉम होम'मुळे लठ्ठपणा वाढला?
  • कोरोना काळात हृदयविकाराच्या रुग्णांचं प्रमाण 20 टक्क्यांनी वाढलं

तुमचं वजन वाढलं असेल तर वेळीच सावध व्हा. कारण, कोरोना काळात वजनवाढीमुळे हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ झालीय. इतकंच नव्हे तर अनेकांनी जीवही गमावलाय. का वाढतोय लठ्ठपणा. 

पाहा हा व्हिडिओ -

घरी बसून रोज तुमचं वजन वाढतंय. आणि कोरोना काळात दिवसेंदिवस वजन वाढणं आरोग्यासाठी धोक्याचं आहे. कारण, कोरोना काळात अनेकांना हृदयविकाराचे आजार जडू लागलेयत. तुम्ही जर वर्क फ्रॉम होम करत असाल तर लगेचच तुमचं वजन मोजून घ्या. लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून घरातूनच ऑफिस काम सुरू असल्याने अनेकांचं वजन वाढल्याने हृदयविकाराच्या तक्रारी समोर आल्यायत. इतकंच नव्हे तर अनेकांचा मृत्यूही झालाय. त्यामुळे वेळीच सावध व्हा. या काळात हृदयविकाराच्या रुग्णांचं प्रमाण 20 टक्क्यांनी वाढलंय...पण, हे प्रमाण का वाढलंय पाहुयात.

  • कोरोनामुळे श्वसनसंस्था, फुफ्फुस यांच्यावर परिणाम होतो
  • हृदय, रक्तवाहिन्यांसंबंधीची यंत्रणाही खालावते
  • बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव असल्याने वजन वाढतं
  • कोरोना संसर्गाच्या भीतीने अनेकांनी नियमित तपासणी करण्याचं टाळलं
  • बहुतांश लोक आजही घरातूनच काम करतायत. त्यामुळे एकाच जागेवर बसून काम करणे, सकाळी आरामात उठणे. रात्री उशिरापर्यंत टीव्ही आणि मोबाईलमध्ये वेळ घालवण्याची सवय लागलीय. यामुळे अनेकांना निद्रानाशाचा त्रास होतोय. घरातच असल्याने खाण्या-पिण्याच्याही वेळा बदलल्यायत. अवेळी वेगवेगळे पदार्थ खाण्याची सवय लागल्याने पचन संस्थेशी संबंधित त्रास वाढलाय. लठ्ठपणा वाढून हृदयविकाराच्या समस्या वाढल्यायत. त्यामुळे तुमचं वजन जर वाढलं असेल तर वेळीच तपासून घ्या.


संबंधित बातम्या

Saam TV Live