VIDEO | हा वरातीतला मोर पाहिला का? लग्नाच्या वरातीत मोर डान्सची धूम

साम टीव्ही
शुक्रवार, 12 मार्च 2021

लग्नाच्या वरातीत ''मोर डान्स'ची धूम
नागीण डान्सनंतर 'मोर डान्स' सुपरहिट
अभिषेकचा वरातीतला मोर जोमात बाकी कोमात

 

 

 

 

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड ट्रेंडिंग आहे. हा व्हिडिओ आहे वरातीतल्या नाच रे मोरा या गाण्यावरील डान्सचा डान्स करणारा हा तरुण कोण याची लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. साम टीव्हीनं या तरुणाला शोधून काढलंय. 

लग्नाच्या वराती नागीण डान्सनं गाजत होत्या. पण आता नाचरे मोरा या गाण्यावरचा डान्स वरातीत लोकप्रिय झालाय. नाच रे मोरा गाण्यावर डान्स करणाऱ्या अभिषेकचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. सोशल मीडियावर लाखोंमध्ये हिट मिळवणारा हा तरुण कोण?.त्याचा शोध साम टीव्हीनं घेतला. हा शोध आम्हाला पुण्याच्या बिबवेवाडीपर्यंत घेऊन गेला. नाचरे मोरा गाण्यावर डान्स करणारा तो तरुण अभिषेक दाळे असल्याचं समोर आलं. अभिषेकचं ज्वेलर्सचं दुकान आहे. मित्राच्या लग्नाच्या वरातीतला हा डान्स सुपरडुपर हिट झाला.

पाकिस्तानात महागाई गगनाला भिडली , हजार रूपयांना आलं तर साडेतिनशे रूपयांना डझनभर अंडी

अभिषेकच्या डान्समुळं नाचरे मोरा हे गाणं आता प्रत्येक वरातीतला डिजेवाला वाजवतो. एवढंच नाही तर चलाओ ना नैणो से बाण रे  हा त्याचा डान्सही सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय आहे. पण अभिषेकच्या मोर डान्सचा नादच खुळा 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live