सायबर हल्ला प्रकरणात वेगळे वळण; महिंद्रा कंपनी म्हणते, ५ कोटींचे नुकसान झालेच नाही

गोपाल मोटघरे
सोमवार, 24 मे 2021

बातमी आहे माहीती व तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या टेक महिंद्रा कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी, कारण एका सायबर हल्ल्यात 5 कोटींच नुकसान झाल्याचा दावा करणाऱ्या या कंपनीने आता चक्क घुमजाव केलं आहे आहे.

पुणे - बातमी आहे माहीती व तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या टेक महिंद्रा tech mahindra कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी, कारण एका सायबर हल्ल्यात  Cyber Attack 5 कोटींच 5 Crore नुकसान झाल्याचा दावा करणाऱ्या या कंपनीने Company आता चक्क घुमजाव केलं आहे आहे. A different twist in cyber attack cases Mahindra says no loss of Rs 5 crore

पिंपरी चिंचवड Pimpari स्मार्ट सिटी Smart City अंतर्गत केल्या जाणाऱ्या विकास कामांपैकी स्मार्ट पार्किंग, स्मार्ट वॉटर, स्मार्ट सिवेज, स्मार्ट ट्राफिक, स्मार्ट पर्यावरण, स्मार्ट सीसीटीव्ही अशी विविध कामांचे सर्व्हर तयार करण्यासाठी  टेक महिंद्राला कोट्यावधीचे कंत्राट देण्यात आलं. मात्र, काही दिवसांपूर्वी आपले सर्व्हर हॅक करण्यात आल्याच सांगत हॅकर्स ने तब्बल 27 सर्व्हर मधील डेटा इन्क्रीप्ट म्हणजेच नासाधुस  केला असून या सायबर हल्ल्यात आपलं 5 कोटी रुपयांच नुकसान झाली अशी टेक महिंद्रा कडून  पोलिसात Police तक्रार करण्यात आली होती.

हे देखील पहा -

पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी ऑफिसवर सायबर हल्ला झाल्याचं कळताच महापालिका प्रशासन खडबडून जागी झाली, त्यानंतर महापालिका  आयुक्त राजेश पाटील यांनी टेक महिंद्राला सायबर हल्ल्यात झालेल्या नुकसानीचा तपशील मागवत नोटीस बजावली होती त्यानुसार टेक महिंद्रा कडून आता सायबर हल्ल्या बाबत लेखी खुलासा देण्यात आलाय.   A different twist in cyber attack cases Mahindra says no loss of Rs 5 crore

सुरुवातीला ५ कोटींच्या नुकसान झाल्याचा दावा करणाऱ्या टेक महिंद्रा कंपनीने आता अचानक असं घुमजाव केल्याने एकूणच या प्रकरणाबद्दलचा संशय अधिक बळावला आहे. दरम्यान हा सगळा प्रकार केवळ सायबर हल्ल्याच्या आड ५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा बनाव करुन विमा लाटण्याचा डाव असल्याची शंका नगरसेविका सिमा सावळे यांनी व्यक्त केली आहे.

राजीनामा देऊन जर आरक्षण मिळणार असेल तर उद्या देतो - छत्रपती संभाजीराजे  

धक्कादायक बाब म्हणजे  सायबर हल्ल्यात 5 कोटींच नुकसान झालं नसल्या बाबत टेक महिंद्राकडून कुठलही नवं पत्र अजूनतरी सायबर सेलला देण्यात आलं नाही. त्यामुळे आधी दाखल असलेल्या तक्रारी नुसारच या प्रकरणाचा तपास करत असल्याचं  सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.  त्यामुळे सायबर हल्ल्या बाबत  टेक महिंद्राने  महापालिकेला जो लेखी खुलासा दिला तो सायबर सेल पोलिसांना का कळवला नाही असा प्रश्न निर्माण झालाय. 

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live