दिलीप कुमार यांना मिळाला डिस्चार्ज

साम टीव्ही ब्यूरो
शुक्रवार, 11 जून 2021

दिलीप कुमार यांची प्रकृती आता ठीक आहे.  श्वास घेण्याकरिता त्रास होत असल्याने दिलीप कुमार यांना रविवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

मुंबई - बॉलीवूड दिग्गज अभिनेते दिलीप कुमार Actor Dilip Kumar यांना मुंबईतील Mumbai Hinduja Hospital हिंदुजा रुग्णालयातुन डिस्चार्ज Discharge from the hospital  मिळाला आहे. दिलीप कुमार यांची प्रकृती आता ठीक आहे. श्वास घेण्याकरिता त्रास होत असल्याने दिलीप कुमार यांना रविवारी सकाळी रुग्णालयात Hospital दाखल करण्यात आले होते. खारमधील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.  Dilip Kumar was finally discharged

हे देखील पहा - 

दिलीप कुमार यांची तब्येत आता चांगली आहे. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये जमलेले पाणी देखील काढण्यात आले आहे. दिलीप कुमार आता घरी परतत आहेत. ही बातमी  दिलीप कुमार यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब आहे. 

 

 

यापूर्वी रुग्णालयात दाखल केल्यानंतर 98 वर्षीय दिलीप कुमार यांना प्‍लुरल एस्‍प‍िरेशन (Pleural Aspiration)च्या प्रक्रियेतून जावे लागले होते. या प्रक्रियेतून त्यांची  फुफ्फुसे आणि छातीच्या भिंतीमध्ये एक सुई आणि ट्यूब टाकली होती. त्यानंतर यातील पाणी बाहेर काढले होते. डॉ. जलील पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दोन वाजता त्यांच्या डाव्या फुफुसमध्ये 350 मिली लीटर पाणी काढण्यात आले आहे. तसेच त्यांची ऑक्सीजन पातळी 100 टक्के आहे. 

थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला तापसी पन्नूने शेयर केला हसीन दिलरुबाचा ट्रेलर 

या दरम्यान त्यांची पत्नी सायरा बानो त्यांच्यासोबत रुग्णालयात होत्या. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना आयसीयु वार्डमधून जनरल वार्डमध्ये नेण्यात आले आहे. हिंदुजा रुग्णालयात डॉ. जलील पारकर आणि कार्डिओलॉजिस्ट डॉ. नितीन गोखले यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले. 

Edited By - Puja Bonkile 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live