गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे

वैदेही काणेकर
सोमवार, 5 एप्रिल 2021

गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा,असेही या पत्रात म्हटले आहे. 

मुंबई : गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा,असेही या पत्रात म्हटले आहे. Dilip Walse Patil to Handle Mahrashtra Home Ministry Portfolio

श्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ (Hassan Mushriff) व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh)यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. Dilip Walse Patil to Handle Mahrashtra Home Ministry Portfolio

मुंबईच्या वकिल जयश्री पाटील (Jayashree Patil) यांनी न्यायालयात देशमुख तसेच वाझे (Sachin Vaze)यांची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर न्यायालयाने हा निकाल दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सीबीआला येत्या १५ दिवसांमध्ये करावी लागणार आहे. सीबीआयने १५ दिवसांत चौकशी करुन न्यायालयाला अहवाल सादर करावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
Edited By- Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live