चक्रीवादळाची दिशा बदलली

संदीप भुजबळ
शुक्रवार, 14 मे 2021

चक्रीवादळाची दिशा बदलली असून आता हे सायक्लोन कर्नाटक व महाराष्ट्रा लगतच्या समुद्रातून गुजरातकडे सरकणार आहे. किनारपट्टीपासून अंदाजे 150 ते 200 किमी अंतरावर या सायक्लोनचा केंद्रबिंदू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

मुंबई : आग्नेय अरबी समुद्रामध्ये Arabian Sea कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे केरळ Keral तसेच लक्षद्वीप Lakshadweep किनाऱ्यावर चक्रीवादळ Cyclone  निर्माण होऊन त्याची तीव्रता वाढत जाण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने Indian Meteorological Department दिला होता. Direction Of The Cyclone Changed 

हे देखील पहा -

मात्र आता चक्रीवादळाची Cyclone दिशा Direction बदलली Changed असून आता हे सायक्लोन कर्नाटक व महाराष्ट्रा लगतच्या समुद्रातून गुजरातकडे सरकणार आहे. तसेच या वादळाचा परिणाम 15 ते 17 मे दरम्यान दक्षिण कोकण Konkan व गोव्याच्या Goa किनाऱ्यावरही होण्याची शक्यता आहे.15 व 16 मे रोजी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. 

किनारपट्टीपासून अंदाजे 150 ते 200 किमी अंतरावर या सायक्लोनचा केंद्रबिंदू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच सायक्लोनच्या प्रवासात जमिनीवर ताशी 20 ते 25 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज देखील वर्तविण्यात आला असल्याने किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कता बाळगण्याचा इशारा  प्रशासनाकडून देण्यात येत आहे. 

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याचा दक्षतेचा इशारा

 

समुद्रामध्ये मासेमारीकरिता गेलेल्या मच्छिमार बांधवानी तातडीने किना-यावर येण्याच्या  सूचना देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. Direction Of The Cyclone Changed

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 17 मे रोजी मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई आणि ठाण्याला हवामान विभागाकडून 17 मे रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच कोकण किनारपट्टीसह लगतच्या पश्चिम महाराष्ट्रातही वेगाच्या वा-यासह पाऊस पडणार आहे. 

Edited By : Krushna Sathe
 


संबंधित बातम्या

Saam TV Live