अपंग गिर्यारोहकाने सर केला माऊंट एव्हरेस्ट

zhang hong
zhang hong

जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणे हे सर्वात कठीण काम. त्याच वेळी, एखादा अपंग व्यक्ती एवरेस्ट चढला तर आपल्याला विश्वास बसणार नाही. तसा विचार आपण स्वप्नातही करू शकत नाही. परंतु, चीनमधील एका नेत्रहीन व्यक्तीने माउंट एव्हरेस्ट सर करून नवा विश्वविक्रम केला आहे. 46 वर्षीय चीनी झँग हॉंग यांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले आहे. झँग हाँग हा विक्रम करणारे आशियातील पहिले आणि जगातील तिसरे  व्यक्ती ठरले आहेत. झँगच्या रेकॉर्डने हे सिद्ध केले आहे की एखाद्या व्यक्तीने मनापासून काहीतरी करण्याचा दृढनिश्चय केला असेल तर तो किंवा ती सर्व अडचणींचा सामना करत त्याच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचते.

झँगने चीनमधील प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले, ''तुम्ही दिव्यांग आहात की सामान्य, काही फरक पडत नाही. आपली दृष्टी गेली असेल किंवा आपल्याला पाय किंवा हात नसतील तर काही फरक पडत नाही. मनात फक्त दृढ निश्चय असणे आवश्यक आहे. आपण इतर लोकांसारखे सर्व काही करू शकता''. 24 मे रोजी झँग यांनी  8,849 मीटर उंच एव्हरेस्टवर विजय मिळवला.(A disabled climber climbed Mount Everest)

झँग हाँग यांनी सांगितले की जेव्हा ते 21 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी दृष्टी गमावली. त्यांचा जन्म नैऋत्य चीनमधील चोंगकिंग शहरात झाला होता. झँग सोबत तीन मार्गदर्शक देखील होते ते गुरुवारीं परत आले आहेत. झँग हाँग म्हणाले की, ''2001 मध्ये एव्हरेस्ट सर करणारे अमेरिकन अपंग गिर्यारोहक एरिक वेह्नमेयर यांना झँग आपला आदर्श मानतात. एरिक वेह्नमेयर यांनी त्यांचे मार्गदर्शक किंग जी यांच्या मार्गदर्शनाखाली एव्हरेस्ट गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतले.

Edited By : Pravin Dhamale

हे देखील पाहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com