लाॅकडाऊन बाबत नवाब मलिक व जयंत पाटील यांच्या वेगळ्या भूमीका

भारत नागणे
मंगळवार, 30 मार्च 2021

लाॅकडाऊन वरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवेगळी भूमीका असल्याचे दिसून येत आहे. लाॅकडाऊन बाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वेगवेगळ्या भूमीका मांडल्या आहेत.

पंढरपूर : राज्यात पुन्हा कोरोना (Corona) रूग्ण संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी राज्यात लाॅकडाऊन(Lock Down) लावावा लागेल, असे वक्तव्य केले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवेगळी भूमीका असल्याचे दिसून येत आहे. लाॅकडाऊन बाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते (NCP) नवाब मलिक व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वेगवेगळ्या भूमीका मांडल्या आहेत.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) हे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, “महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एका दिवसात ४० हजारांहून पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. आम्ही सर्वांनी मुख्यमंत्र्यांकडे लॉकडाउन हा पर्याय नसल्याचा आग्रह धरला होता.मात्र रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांनी प्रशासनाला लॉकडाउनची तयारी करण्यास सांगितलं आहे. पण याचा अर्थ लॉकडाउन अपरिहार्य आहे असं नाही.त्यामुळे जर लोकांनी नियम पाळले तर लॉकडाउन टाळता येऊ शकतो,'' अशी भूमीका नवाब मलिक यांनी माडली होती.

दुसरीकडे जयंत पाटील (Jayant Patil) यांंनी मात्र याच्या विसंगत भूमीका मांडली. जयंत पाटील यांनी लाॅकडाऊनला राष्ट्रवादीचा विरोध नसल्याचे आज सांगितले आहे . त्यामुळे लाॅकडाऊवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच मतभेद असल्याचे समोर आलं आहे.

Edited By-Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live