VIDEO | चीनमध्ये कोरोनाच्या भयाण रुपाचा शोध

साम टीव्ही
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

आता चीनमधनं एक हादरवून सोडणारी बातमी येतेय. चीनमध्ये कोरोनाच्या भयाण रुपाचा शोध लागल्याची माहिती मिळतेय. काय आहे हा नवा कोरोना विषाणू ?

आता चीनमधनं एक हादरवून सोडणारी बातमी येतेय. चीनमध्ये कोरोनाच्या भयाण रुपाचा शोध लागल्याची माहिती मिळतेय. काय आहे हा नवा कोरोना विषाणू ? तुम्हीच पाहा खालील व्हिडीओत...

चीनमधनं हादरवून सोडणारी एक बातमी येतेय. चीनमध्ये कोरोना विषाणूच्या एका नव्या आणि आणखी भयाण रुपाचा शोध लागलाय. धक्कादायक म्हणजे या कोरोनात स्वत;त वेगानं बदल करण्याची क्षमता आहे, स्वत:त बदल करण्याच्या क्षमतेमुळे कोरोना विषाणूची चाचणी खंडित होऊ शकत नाही. कोरोना अत्यंत वेगानं पसरु शकतो. 11 रुग्णांवर केलेल्या अभ्यासानंतर चीनी शास्त्रज्ञांना हा शोध लागलाय.

एकदा का कोरोना विषाणू स्वत:त बदल करायला लागला की त्यावर लस शोधण्याच्या प्रयत्नांना खीळ बसेल. अजून तरी भारतात असलेल्या विषाणूत स्वत:त बदल करण्याची क्षमता नाही. त्यामुळेच कोरोनाची साखळी तोडण्याची वेळ गेलेली नाही. चीनमध्ये सापडलेला या नव्या विषाणूमुळे आपण वेळीच सतर्क होण्याची संधी आपल्याला मिळालीय.


संबंधित बातम्या

Saam TV Live