मुंबईत फ्लाईंग वडापावची चर्चा,रघु डोसावाल्याची 60 वर्षांची परंपरा

साम टीव्ही
बुधवार, 24 मार्च 2021

मुंबईत फ्लाईंग वडापावची चर्चा

फ्लाईंग वडापावचा व्हिडिओ व्हायरल

रघु डोसावाल्याची 60 वर्षांची परंपरा
 

वडापाव म्हणजे मुंबईची एक खास ओळख. त्यातही मुंबईतल्या बोरा बाजार इथला एक वडापाववाला लक्षवेधी ठरतोय. 

वडा पाव म्हणजे मुंबईकरांचा जीव की प्राण. बोरा बाजारमधल्या या साठ वर्षांची परंपरा असलेल्या रघु डोसावाल्याचा हा फ्लाईंग वडापावचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. हा व्हिडिओ आमची मुंबई नावाच्या एका फूड ब्लॉगरनं यूट्यूबवर पोस्ट केला असून त्याला आतापर्यंत 2,71,654 व्ह्यूज मिळाले आहेत. रघू डोसावाल्याच्या स्टॉलवरची पदार्थ बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया पाहतांना खवय्यांना मजा येते. या वडा पावची चव, चीज आणि बटरसह अत्यंत स्वादिष्ट लागते. त्यातही रजनीकांतप्रमाणे केलेले असे स्टंट लक्षवेधी ठरतात

स्ट्रिट फुड म्हणजे खवय्या मुंबईकराचं खास आकर्षण.
या रघुच्या या स्टॉलवर डोसा, इडली वडा, चीज आणि मसाला वडा पाव असे विविध स्नॅक्स सर्व्ह केले जातात. मुंबईच्या गल्लीबोळांमध्ये दडलेली अशी कितीतरी छुपी रत्नं हेच मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचं वैभव आहे.. अस्सल दर्दी खवय्ये मुंबईकर अशा ठिकाणी हमखास गर्दी करतात.

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live