बारामतीत एका 72 वर्षीय कॅनॉलमध्ये पोहणाऱ्या आजीची जोरदार चर्चा....

swiming
swiming

बारामती : सध्या बारामतीतील Baramati एका 72 वर्षीय आजीची बारामतीत जोरदार चर्चा सुरू आहे. आळंदीबाई सरतापे असे आजीचे नाव आहे. बारामती तालुक्यातील मळशी Malshi गावच्या आजी सध्या कॅनॉलमध्ये पोहोतना दिसत आहेत. या आजी रोज कॅनॉलमध्ये Canal पोहण्यासाठी येतात. त्यांना पाहून लोकं आश्चर्यचकित होत आहे. Discussion of  seventy two year old grandmother is going on in Baramati
 
यांना आजी म्हणायचं का हा प्रश्न तरुणांना पडत आहे. कारण अगदी पट्टीच्या पोहोणाऱ्या व्यक्तीला देखील कॅनॉल पार करता येत नाही. परंतु या आजी सहजपणे एका तिरावरून दुसऱ्या तिराला जतात. आता आजी कॅनॉलमध्ये पोहतात म्हटल्यावर चर्चा तर होणारच. आजी पोहायला लागल्या याचा इतिहास मोठा रंजक आहे.  

आजी 72 वर्षाच्या आहेत पण एखाद्या पट्टीच्या पोहोणाऱ्याला लाजवतील आशा या आजी पोहोतात. आजी मनसोक्त पोहोण्याचा आनंद घेतात. या वयात आजी ठणठणीत आहेत. आजीला कोणताच आजार नाही ना कोणता त्रास आहे. Discussion of  seventy two year old grandmother is going on in Baramati 

पोहणे हा आजीचा लहानपणीचा छंद आहे. तो नव्याने जोपासण्याचा प्रयत्न आजी करीत आहेत. पोहोणे हा सर्वोत्तम व्यायाम मानला जातो त्यामुळे आजीचे शरीर या वयातही धडधाकट आहे. कोरोना काळात असं धड धाकट शरीर असणं गरजेचं आहे. 

Edited by- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com