साताऱ्यात रंगलीये स्टेलाच्या डोहाळे जेवणाची चर्चा 

ओंकार कदम
गुरुवार, 29 एप्रिल 2021

सध्या कोरोनाच्या काळामध्ये लोक कार्यक्रम करण्याचे टाळत आहेत. मात्र कोळेवाडीत (ता.कराड) येथे अमर भागवत यांनी सोशल डिस्टन्स ठेवून घरातल्या घरात मुक्या प्राण्याचा उत्साहाने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला आहे.

सातारा: कोरोनाचा प्रादुर्भाव Corona दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे सध्या कोरोनाच्या काळामध्ये लोक कार्यक्रम Function करण्याचे टाळत आहेत. मात्र कोळेवाडीत Kolewadi (ता.कराड) येथे अमर भागवत यांनी सोशल डिस्टन्स Social Distance ठेवून घरातल्या घरात मुक्या प्राण्याचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला आहे. Discussion of Stellas baby shower in Satara

एखाद्या घरातल्या मुलीचे डोहाळे जेवण Baby Shower जसे करतो तसे त्यांनी  पाळलेली प्राणी स्टेला Stella हिला चक्क पाळण्यात बसवले. डोहाळे जेवणाच्या सर्व विधी करण्यात आल्या. स्टेला ही १८ महिन्याची असून ती आता आई होणार आहे.

भागवत यांच्या घरच्यांना कुत्री सांभाळण्याची फार आवड आहे. जरी हे मुके प्राणी असले तरी ते प्रामाणिक आहेत म्हणून त्यांनी जॅानी, रोमी, स्विटी, अलेक्सा, याच बरोबर स्टेला अशी त्यांना नांवे दिली आहेत. त्यांची पत्नी आणि दोन मुली अशा कुटुंबात हे पाच पाळीव प्राणी आहेत. मात्र ते आता कुटुंबाचे सदस्य बनले आहेत. 

आज त्यांच्या स्टेलाचे डोहाळे जेवण होते या जेवणानिमित्त त्यांनी अनेक प्रकारची फळे नारळ आणले होते. हळदीकुंकू लावून तिला महिलांनी ओवाळले. नंतर पाळण्यात बसवले आणि झोके दिले. भागवत कुटुंबीयांनी या मुक्या प्राण्यांच्या केलेल्या सोहळ्याची चर्चा मात्र आता चांगलीच रंगली आहे. 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live