राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी यांचा वाद विकोपाला जाण्याची चिन्हं

साम टीव्ही
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

 

  • ठाकरे सरकारमध्ये काहीतरी गडबड 
  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची सरकारवर थेट टीका
  • राज्यपालांच्या टीकेवर महाविकास आघाडीचा प्रहार 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकारमध्ये काहीतरी गडबड आहे असं वक्तव्य करत कोश्यारींनी थेट सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. तर महाविकास आघाडीनं त्यांना प्रत्युत्तर दिलंय. 

राज्यपाल विरूद्ध महाविकास आघाडी सरकार हा वाद आता शिगेला पोहचलाय. आता तर थेट जाहीर कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडीवर टीका केलीय. निमित्त होतं आंतरराष्ट्रीय खेळाडू कविता राऊतच्या नोकरीचं.

कविता राऊतला सरकारी नोकरी मिळावी यासाठी मी राज्य सरकारला सूचना केल्या. पण काही ना काही त्रुटी काढून सरकार या विषयांत चालढकल करत असेल तर सरकारमध्ये काहीतरी गडबड आहे अशी टीका राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलीय. 
सुरगाणा तालुक्यातील भिंतघर इथं आदिवासी सांस्कृतिक केंद्राच्या उदघाटन सोहळ्यात त्यांनी ही जाहीर टीका केलीय.  तर राज्यपाल जाहीर वक्तव्य करून आपल्या पदाचं महत्व कमी करत असल्याची टीका राष्ट्रवादीनं केलीय. 

सत्तास्थापनेच्या पहिल्या दिवसापासून राज्यपाल विरूद्ध महाविकास आघाडी असा कलगीतुरा यापूर्वीही महाराष्ट्रानं पाहिलाय. आमदारांची नियुक्ती असो वा सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरण राज्यपाल आणि महाविकास आघाडीत कायम संघर्षाचीच स्थिती राहिलीय. त्यात आता राज्यपालांनी सरकारमध्ये थेट गडबड असल्याचं म्हंटल्यानं हा वाद टोकाला जाणार हे नक्की...


संबंधित बातम्या

Saam TV Live