तुम्ही केलेल्या कोरोना चाचणी असू शकते चुकीची, कारण...कोरोना चाचणी किट बोगस असल्याचं उघड

साम टीव्ही
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020
  • सावधान ! कोरोना चाचणी किट बोगस?
  • तुम्ही केलेल्या कोरोना चाचणीवर प्रश्नचिन्ह
  • राज्यात साडे 12 लाख बोगस RTPCR किट्स वितरित

 तुम्ही कोरोनाची चाचणी केली असेल किंवा करणार असाल तर ही बातमी पुर्ण वाचा. तुम्हाला अनेक प्रश्न पडतील. शिवाय कोरोना चाचणी करतानाही खूपदा विचार कराल. कारणंही तसंच आहे.

हा रिपोर्ट पाहा आणि कोरोना चाचणी करताना काळजी घ्या.

तुम्ही कोरोनाची चाचणी करताय तर वेळीच सावध व्हा. तुमचा रिपोर्ट बरोबर येईल याची खात्री नाही. कारण, राज्यात तब्बल साडे बारा लाख आरटीपीसीआर किट्स बोगस असल्याचं समोर आलंय. त्यामुळे तुम्ही केलेल्या चाचण्यांचा रिपोर्ट काय येईल ते सध्या सांगता येत नाही. बोगस किट्स राज्यात वितरित झाल्याची माहितीच खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच दिलीय.

जीसीसी बायोटेक कंपनीच्या आरटीपीसीआर किटस् लो पॉझीटीव्हीटी रेट आढळून आलाय. या बोगस किट्सचा वापर तातडीने थांबवण्यात आलाय. किट्स वितरित करणाऱ्या GCC बायोटेक लिमिटेड कंपनीवर कारवाई करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिलीय. पण, चाचणी चुकीची आली असेल त्यांचं काय? एखाद्या पॉझिटीव्ह रुग्णाची चाचणी निगेटीव्ह आली असेल तर त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचं काय? त्या रुग्णापासून किती जण कोरोनाबाधित झाले असतील? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत.

आता यावर चौकशी होईल, कंपनीवर कारवाई करतील हे आता सगळं होईलच. पण, अशा बोगस किट्सने चाचणी करणं कितपत योग्य ? त्यामुळे तुम्ही योग्य ठिकाणीच चाचणी करा आणि आरोग्याची काळजी घ्या.


संबंधित बातम्या

Saam TV Live