गरीब व गरजू लोकांना वाढदिवसा निमित्त धान्य किटचे वाटप

अजय दुधाणे
मंगळवार, 1 जून 2021

वाढदिवसानिमित्त BIrthday कोणताही गाजावाजा,पार्टी Party न करता गरिबांच्या Poors तोंडात अन्नाचा एक घास देण्याचा स्तुत्य उपक्रम गणपती कांबळे यांनी आज केला. 

 

उल्हासनगर -  देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान Corona Second Wave माजवले आहे. अनेक राज्यात लॉकडाऊनच्या Lockdown जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व दैनंदिन व्यवहार Business बंद पडले आहेत. यामुळे लोकांच्या हाताला काम नाही. अशा लोकांना दोन वेळेच्या जेवणाची सोय व्हावी या उद्देशाने कोरोनासारख्या  Covid -19 साथीच्या आजारामुळे अनेक गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आलेली आहे. Distribution of birthday kits to the poor and needy

म्हणून  हा सहानुभुतीपुर्वक विचार करून उल्हासनगर मधील आशेळे गावचे शाखा प्रमुख गणपती कांबळे यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवसानिमित कोरोना काळात परिसरात साफसफाईचे काम करणारे सफाई कामगारांचा, कोरोना योद्धा म्हणून सत्कार केला. 

हे देखील पहा - 

तसेच परिसरातील गोरगरीब गरजू लोकांना वीस किलो धान्य, कांदे, बटाटे, चहा पावडर, साखर अश्या किटचे वाटप केले. सुमारे दोनशे ते अडीचशे लोकांना हे किट देण्यात आले.

26 राज्यात कोरोनानंतर आता म्युकर मायकोसिसचा कहर !

वाढदिवसानिमित्त कोणताही गाजावाजा,पार्टी न करता गरिबांच्या तोंडात अन्नाचा एक घास देण्याचा स्तुत्य उपक्रम गणपती कांबळे यांनी आज उल्हासनगर मधील गणपत नगर परिसरात केला.

Edited By - Puja Bonkile


संबंधित बातम्या

Saam TV Live