विठ्ठल दर्शनापूर्वी कोरोना चाचणी बंधनकारक करण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार..

Pandharpur Vitthal Mandir
Pandharpur Vitthal Mandir

पंढरपूर - पंढरपुरातील विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची देखील कोरोना चाचणी करूनच त्यांना मंदिरात प्रवेश देण्याचा विचार सुरू आहे. त्या दृष्टीने काय करता येईल या विषयी जिल्हा प्रशासनाकडून विचार सुरू आहे. District administrations Planning to Make Corona test mandatory before Vitthal Darshan 

शासनाच्या निर्देशानंतर गेल्या काही  महिन्यापासून पासून मंदिरात मुख दर्शनासाठी भाविकांना प्रवेश देण्यास सुरु करण्यात आली होती. त्यामुळे पंढरपुरात (Pandharpur) बाहेरगावावरून काही प्रमाणात भाविक येऊ लागले आहेत. राज्यभरात (Maharashtra) कोरोनाचा प्रकोप वाढू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार गंभीरपणे विचार करू लागले आहे.कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध केले जात आहेत.

दरम्यान सध्या तरी भाविकांची कोरोना चाचणी करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला नसल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले. तब्बल आठ ते नऊ महिन्यांच्या लाॅकडाऊन (Lock Down) नंतर दिवाळी पाडव्या पासून कोरोनाचे नियम पाळून भाविकांना मुखदर्शनासाठी मंदिर खुले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून गर्दी ही कमी झाली आहे.त्यातच आता राज्यात कोरोनाचा हाहा:कार उडाला आहे.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून म्हणून गर्दी टाळण्यासाठी सरकारकडून अनेक उपाय योजना केल्या आहेत. District administrations Planning to Make Corona test mandatory before Vitthal Darshan 

Editing By - Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com