दिवेआगरच्या सुवर्ण गणेशाची होणार पुनर्स्थापना

Diveagar Ganpati Mandir
Diveagar Ganpati Mandir

अलिबाग : दिवेआगर (Diveagar) येथील चोरीला गेलेल्या सुवर्ण गणेशाची पुनर्स्थापना करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) परवानगी दिली आहे. वितळवलेल्या मूर्तीचे सोने सध्या न्यायालयाच्या  ताब्यात असून ते राज्य सरकारकडे देण्यात येणार आहे. त्यापासून पूर्वीप्रमाणे मुखवटा तयार करून मंदिरात त्याची स्थापना करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Restoration of the golden Ganesha of Diveagar will be Done by High Court Order)

17 नोव्हेंबर 1997 रोजी दिवेआगर येथील द्रौपदीबाई धर्मा पाटील(Draupadibai Dharma Patil) यांच्या शेतात खोदकाम करताना एका तांब्याच्या पेटीत सोन्याच्या गणपतीसह (Golden Ganesh) काही दागिने सापडले होते. नियमानुसार सोन्याचा मुखवटा आणि इतर दागिन्यांची कोणाचीही मालकी नसल्याने ते सरकारच्या मालकीचे असल्याचे जाहीर झाले. त्यानुसार भाविकांना सुवर्ण मुखवट्याचे दर्शन घेता यावे, यासाठी 14 जानेवारी 1998 रोजी रायगडच्या (Raigad) जिल्हाधिकाऱ्यांनी मुखवट्याची गणपती मंदिरात स्थापना करण्याची परवानगी दिली होती. तसेच गणपती ट्रस्टच्यावतीने सुरक्षेचीही व्यवस्था करण्यात आली होती.

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या गणपती (Ganpati) मंदिरातील सुरक्षारक्षकांचा 23 मार्च 2012 रोजी खून करून गणपतीच्या सोन्याच्या मुखवट्याची आणि दागिन्यांची चोरी झाली होती. पोलिस (Police) तपास पूर्ण करून अलिबाग सत्र न्यायालयाने आरोपींना शिक्षाही ठोठावली आहे. आरोपींनी मुखवटा वितळवून लगड तयार केले आहे. 1361 ग्रॅमचे लगड जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. सोने सापडल्याने ते परत मिळवण्यासाठी ट्रस्टने अलिबाग न्यायालयात अर्ज दाखल केला.  

परंतु मुखवटा शिल्लक नसल्याने ते परत देण्यास सरकारने नकार दिला आहे. पुढे या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयापर्यंत गेली. आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात शिक्षेविरुद्ध आपिल दाखल केल्यामुळे सोन्याचा वापर करता येत नव्हता. त्यामुळे त्याच सोन्यापासून पुन्हा मुखवटा बनविला जावा, अशी भाविकांना आशा होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकरी श्रीवर्धन अमित शेडगे यांनी उच्च  न्यायालयातील अतिरिक्त सरकारी वकील शिरकांत विठ्ठल गावंड यांच्यामार्फत सदर गुन्ह्यात परत मिळविण्यात आलेल्या सोन्यापासून मुखवटा बनवून तो पुन्हा दिवेआगर येथील गणेश मंदिरामध्ये ठेवण्याची परवानगी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला होता. Restoration of the golden Ganesha of Diveagar will be Done by High Court Order

बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात या अर्जावर न्या. रेवती मोहिते- डेरे( Revati Mohite- Dere) यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली आणि सोन्याचा वापर करून गणपतीचा मुखवटा तयार करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.

Edited By-Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com