दिवाकर रावतेंना मातोश्रीवर नो एंट्री 

दिवाकर रावतेंना मातोश्रीवर नो एंट्री 
मुंबई  : विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून यात शिवसेनेला अपेक्षित यश मिळालं नाही.हे समजताच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर धाव घेतली.मात्र मातोश्रीच्या गेटवर पोहोचलेल्या दिवाकर रावतेंना मातोश्रीवर जाण्यास मज्जाव करून त्यांना थेट शिवसेना भवन वर जाऊन वाट पाहण्याचा सल्ला देण्यात आला.

विधानसभा निवडणुकीच्या निकालाच चित्र स्पष्ट झालं असून यात मुख्यमंत्रीपदावर दावा करणाऱ्या शिवसेनेला अपेक्षित आकडा गाठता आलेला नाही.या निकालावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते देखील लक्ष ठेऊन होते. सकाळपासूनच निकालावर लक्ष ठेऊन असलेल्या दिवाकर रावतेंना शिवसेनेची पडझड दिसताच ते ताबडतोब उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीकडे निघाले,मात्र मातोश्रीच्या गेटवर पोहोचताच रावतेंना मातोश्रीच्या गेटवरच अडवण्यात आलं.

त्यांनी आपल्याला उद्धव ठाकरेंना भेटायचं असल्याचं वारंवार सांगितलं मात्र 'साहेबांनी आपल्याला भेटायला नकार दिला असून,साहेब आपल्याला शिवसेना भवन येथे भेटतील' असा निरोप देण्यात आला.यामुळे रावतेंना शिवसेना भवनवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ताटकळत बसावे लागले.

विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून भाजप-शिवसेना महायुतीच्या बहुमताच्या जवळपास पोहोचली आहे.अस असलं तरी महायुतीमधील बऱ्याच जागांची पडझड झाली असून ती रोखण्यात भाजपसह शिवसेनेला ही अपयश आलं आहे.

या निवडणुकीत शिवसेनेला ही मोठा फटका बसला असून त्यांना आपली जुनी संख्या ही राखता आली नाही.यामुळे शिवसेना आणि शिवसेना नेत्यांमध्ये नैराश्य पसरलं आहे.हे नैराश्य झटकत आपल्या नेत्याला धीर देण्यासाठी पोहोचलेल्या दिवाकर रावतेंना 'मातोश्री' बाहेरच का अडवण्यात आलं याचीच चर्चा सुरू आहे.

WebTittle: Diwakar Rawaten no entry on Matoshree

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com