म्हाडा कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीत 20 हजार रुपये  

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

 

 

मुंबई :  राज्यभरामध्ये म्हाडाच्या विविध मंडळांतील विभागांमध्ये सुमारे अडीच हजार कर्मचारी काम करतात. यामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य), मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी, उपअभियंता(स्थापत्य व विद्युत), साहाय्यक विधि सल्लागार, विधि साहाय्यक, लेखाधिकारी, मिळकत व्यवस्थापक/ प्रशासकीय अधिकारी, साहाय्यक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य व विद्युत) या पदांची तर लघुटंकलेखक आणि कनिष्ठ लिपिक टंकलेखक, अभियांत्रिकी साहाय्यक, भूमापक, वायरमन आदी विविध पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व कर्मचाºयांना २० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार असल्याने यंदा म्हाडा कर्मचाºयांची दिवाळी चांगली साजरी होणार आहे. गेल्या वर्षी कर्मचाºयांना १७ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदा यात तीन हजारांनी भर पडली आहे.
म्हाडा कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीमध्ये २० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. बुधवारी म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये याबाबतच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट मिळणार आहे. 

Web Title: Diwali gift to MHADA employees, Rs 20,000 sanitary grant
 


संबंधित बातम्या

Saam TV Live