"अण्णा या नालायकांसाठी आपले प्राण पणाला लावू नका"-राज ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 फेब्रुवारी 2019

पुणे : "अण्णा या नालायकांसाठी आपले प्राण पणाला लावू नका. हे खोटारडे आहेत. अण्णांसोबत माझे बोलणे झाले आहे.  मी अण्णांना सांगितले आहे,"  असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राळेगणसिद्धी येथे नागरिकांसमोर बोलताना सांगितले. 

राज ठाकरे यांचे सोमवारी सकाळी अकाराच्या सुमारास अचानक राळेगणसिद्धी येथे आगमन झाले. त्यांनी आधी सर्वांसमोर अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यांनतर सुमारे दहा मिनिटे अण्णा आणि राज ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर राज ठाकरे यांनी जमलेल्या नागरिकांशी लाऊड स्पीकरवर संवाद साधला . 

राज ठाकरे म्हणाले, "अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळेच नरेंद्र मोदी आणि भाजपचे सरकार केंद्रात सत्तेत आले.  भाजपने  तेंव्हा लोकपालला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. आता सत्तेत येऊन त्यांना साडेचार वर्षे पूर्ण झाली आहेत पण त्यांनी अद्याप त्याची अंमलबजावणी केलेली नाही. हे ढोंगी आणि खोटारडे आहेत. या नालायकांसाठी प्राण  पणाला लावू नका असे मी अण्णांना सांगितले आहे. खरे तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येथे आणा पाठिंबा देण्यासाठी यायला हवे होते. केजरीवाल आज मुख्यमंत्री आहेत ते अण्णांच्या दिल्ली येथील आंदोलनामुळेच!"

web tittle- Do not let your life die for the welfare -raj thakrey 

संबंधित बातम्या

Saam TV Live