50 पेक्षा अधिक रूग्णांवर उपचार नको, पालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या असंवेदनशील भूमिकेने संताप

nagarpalika
nagarpalika

बदलापूर - राज्यभरात कोरोना Corona रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सर्वच रूग्णालयात Hospital खाटा Bed अपुऱ्या पडू लागल्याने रुग्णांना दिलासा देण्यासाठी त्यांना जमिनीवर झोपवून रुग्णांवर आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर Doctor उपचार करत आहेत. या परिस्थिती कुळगाव बदलापूर Badlapur नगरपालिका क्षेत्रातील गौरी सभागृहात सुरू असलेल्या कोविड रुग्णालयात Covid Hospital उपचाराधिन गंभीर रूग्णांची संख्या 50 वर जाऊ न देण्याचा सूचना डॉक्टरांना देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या येथे गंभीर 83 रूग्णांवर उपचार केले जात आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या या पत्रावर आता संताप व्यक्त करण्यात येत आहे. Do not treat more than 50 patients

रूग्णसंख्या वाढल्याने अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांना दिलासा देण्यासाठी खाटा वाढवून उपचार केले जात आहेत. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून ऑक्टोबर October महिन्यात पश्चिमेतील गौरी सभागृहात सुरू करण्यात आलेल्या अतिदक्षता विभागात 30 खाटांची सोय होती. गेल्या वर्षात डिसेंबर December महिन्याच्या सुमारास येथे रूग्णसंख्या 50 पर्यंत पोहोचली होती. कालांतराने ही संख्या घटल्याने पालिकेचे चक्क हा विभागच बंद केला होता. मार्च March महिन्यात लोकांचा संताप वाढू लागल्याने काही दिवसातच हा विभाग पुन्हा सुरू करण्याची नामुष्की पालिकेवर आली होती.

सध्या शहरात गंभीर रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने या विभागात क्षमतेपेक्षा अधिक रूग्णांवर उपचार केले जात आहेत. आसपासच्या शहरात थेट मुंबईंपर्यंत रूग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नसल्याने शहरातल्या रूग्णांची येथे व्यवस्था झाली. त्यामुळे नातेवाईकांची फरफटही थांबली. सध्या गौरी सभागृहातील या अतिदक्षता विभागात 83 गंभीर रूग्णांवर उपचार केले जात आहेत. Do not treat more than 50 patients

मात्र रूग्णांना दिलासा मिळत असला तरी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांनी चक्क या विभागाचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीला 50 रूग्णांपेक्षा अधिक रूग्णांवर उपचार नको अशी असंवेदनशील सूचना केल्याचे समोर आले आहे. तसे लेखी पत्र संबंधित कंपनीला दिला असल्याचे समोर आले आहे. तसेच क्षमतेपेक्षा अधिक रूग्ण दाखल केल्याने शहरात प्राणवायुचा तुटवडा निर्माण झाला असल्याचा जावईशोधही या अधिकाऱ्याने आपल्या पत्रात लावला आहे.

ते कराराच्या विरूद्ध आणि कार्यादेशाला अनुसरून नसल्याने यापुढे 50 पेक्षा अधिक रूग्णांना दाखल करून घेऊ नये असा इशारा त्यांनी पत्रात दिला आहे. त्यामुळे येथे अतिदक्षता विभागाचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी संभ्रमात पडले आहे. तर या असंवेदनशील पत्रावर आता शहरभरातून संताप व्यक्त होतो आहे. अशा गंभीर परिस्थितीत रूग्णांवर उपचार करणे महत्वाचे की खाटांच्या संख्येवर इशारा देणे असा सवाल रूग्णांच्या नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे. रूग्णांसाठी प्राणवायुचा साठा मिळवण्याऐवजी खाटा कमी करणे हा कसा पर्याय असाही प्रश्न आता उपस्थित होतो आहे. तर बदलापूरच्या नागरिकांनी जायचे कुठे असा प्रश्न ता उपस्थित केला जात आहे. Do not treat more than 50 patients

अतिदक्षता विभागात 50 पेक्षा अधिक रूग्ण नको असे पालिकेचे वैद्यकीय अधिकारी सांगत असले तरी शहरातल्या रूग्णांची भरती पालिकेमार्फतच केली जाते. त्यात ठेकेदाराचा  कोणताही सहभाग नसतो. भरती केलेल्या रुग्णांवर उपचार करणे पालिकेची जबाबदारी असल्याने आता नगरपालिका हा फतवा कधी मागे घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com