तुम्हाला बँकांचे नवीन बदल माहित आहेत का ? माहित नसतील तर हे नक्की वाचा ..

साम टीव्ही
सोमवार, 15 मार्च 2021

बँक धारकांसाठी एक नवा बदल १ एप्रिल पासून लागू होणार आहे.बँकाच्या विलनीकरणानंतर अनेक बँकांचे चेकबुक, पासबुक आणि आयएफएससी कोडमध्ये मोठे बदल होणार आहेत

बँक धारकांसाठी एक नवा बदल १ एप्रिल पासून लागू होणार आहे.बँकाच्या विलनीकरणानंतर अनेक बँकांचे चेकबुक, पासबुक आणि आयएफएससी कोडमध्ये मोठे बदल होणार आहेत . देशातील सात बँकांमध्ये हा बदल व्यव्हार करताना जाणवू शकतो.

त्यात देना बँक, विजया बँक, कॉर्पोरेशन बँक, आंध्रा बँक, ओऱिएंटल बँक ऑफ कॉमर्स, यूनायटेड बँक आणि इलाहाबाद बँकेच्या ग्राहकांना एक एप्रिलपासून होणाऱ्या या बदलांचा फटका बसू शकतो .अनेक बँकांची जुने चेकबुक आणि आयएफएससी कोड निष्क्रीय होणार आहेत. त्यामुळे या सात बँकांमध्ये खाती असणाऱ्या ग्राहकांनी बँकेत फोन करुन आपला नवीन कोड जाणून घेणं फायद्याचं ठरु शकतं. बदलेला कोड ठाऊक असल्यास ऑनलाइन व्यवहार करताना ग्राहकांना काही अडचणी येणार नाहीत.

१ एप्रिल २०२० पासून सरकारने देशातील तीन बँकांच्या विलनीकरणाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटर बँक ऑफ कॉमर्स आणि यूनायटेड बँक ऑफ इंडियाच्या विलनीकरण होणार आहे. त्याचबरोबर विजया बँकेचं विलनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झालं असून हा बदल एक एप्रिलपासून लागू होणार आहे. त्याचबरोबर सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत तर आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक यूनियन बँके ऑफ इंडियामध्ये विलीन होणार आहे. तसेच इलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन होणार आहे.

आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेमध्ये खातं असणाऱ्या ग्राहकांना बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरुन लॉगइन करण्यासाठी नव्या आयएफएससी कोडचा वापर करु शकतात. याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी ग्राहकांना www.unionbankofindia.co.in या वेबसाईटला भेट द्यावी लागले.या वेबसाईटवरील अमल्गमेशन सेंटर पर्यायावर क्लिक करावं लागेल. येथे क्लिक केल्यानंतर नवीन आयएफएससी कोडसंदर्भातील माहिती ग्राहकांना मिळेल. तसेच बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकांवर १८००२०८२२४४ अथवा १८००४२५१५१५ अथवा १८००४२५३५५५ वर फोन करुन ग्राहक माहिती घेऊ शकतात. 

आज आणि उद्या बँक कर्मचारी संपावर 

एसएमएसच्या माध्यमातून माहिती मिळवण्याचाही पर्याय ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आलाय. यासाठी ग्राहकांना जुना आयएफएससी क्रमांक, ‘IFSC स्पेस 00000 (OLD IFSC) स्पेस’ अशा स्वरुपात ९२२३००८४८६ वर पाठवल्यावर नवीन आयएफएससी क्रमांक कळू शकतो.

ग्राहकांना याविषयी घाबरण्याची गरज नाही .योग्य माहितीसाठी संकेतस्ळावर किंवा बँकेत जाऊन भेट द्या . सर्व शाखांमध्ये जुन्या आयएफएससी कोडवरुन ३१ मार्च २०२१ पर्यंत व्यवहार सुरु राहणार आहेत.

                                           साम टीव्ही, रसिका बागवे


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live