कुल्लू मनालीला जायचं का? पूजा चव्हाण प्रकरण

साम टीव्ही
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तब्बल पंधरा दिवसांनंतर वन मंत्री संजय राठोड  हे पोहरादेवी येथे माध्यमांसमोर आले. या प्रकरणात पोलीस चौकशी करत आहे, चौकशी पूर्ण होईपर्यंत आपल्याला काहीही बोलायचं नाही

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तब्बल पंधरा दिवसांनंतर वन मंत्री संजय राठोड  हे पोहरादेवी येथे माध्यमांसमोर आले. या प्रकरणात पोलीस चौकशी करत आहे, चौकशी पूर्ण होईपर्यंत आपल्याला काहीही बोलायचं नाही, असेही ते म्हणाले. मात्र पुणे पोलीस  खरंच या प्रकरणाची नेमकी काय चौकशी करत आहेत. गेल्या पंधरा दिवसात पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह एकही आयुक्तालयातला बडा अधिकारी या विषयावर बोलायला तयार नाही. त्यातच पूजा चव्हाण प्रकरणात आणखी एक अशीच ऑडिओ क्लिप पुन्हा व्हायरल झाली आहे.

या क्लिपमध्ये फोनवर बोलणारी तरुणी 'तुमच्या विनंतीवरून तुमचा नंबर चा ब्लॉक काढला आहे. तुमच्या पुढे आम्हाला जाता येत नाही' असं म्हणत लाडाने 'यंदा पुण्या-मुंबईला नको जम्मू-काश्मीर, कुल्लू मनालीला न्या' अशी विनंती ही करताना दिसते. तर समोरून बोलणारी व्यक्ती सोबत लोकंअसल्यामुळे फार बोलता येत नाही, आपण पाहिजे तिथे  जाऊ, असं म्हणते.

ही ऑडिओ क्लिप पूजा चव्हाण हिच्या लॅपटॉपमधून लीक झाली असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, या सगळ्या प्रकरणाचा तपास करणारे पुणे पोलीस यावर काहीच बोलायला तयार नाहीत. यापूर्वीच्या ही 11 क्लिप आल्या कुठून आणि वनमंत्री संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांच्या मोबाईलचे सीडीआर या कुठल्याही गोष्टीचा तपास पुणे पोलीस करत नाही. पुणे पोलिसांतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता केवळ तपास सुरू आहे. एवढेच उत्तर गेले पंधरा दिवस पुणे पोलिसांकडून दिले जात आहे. 

याचं कारण तांत्रिक तपास करण्यासाठी अशा केसेसमध्ये दोन दिवस पुरेसे असताना पुणे पोलीस इतका वेळ का घेत आहेत यवतमाळ आणि बीडला जाऊन आलेल्या पथकाने नेमकं काय केलं असे अनेक प्रश्न आहेत. आजपासून पुन्हा कामाला लागणार असे म्हणणारे वनमंत्री संजय राठोड यांनी बंजारा समाजाला एकत्र आणून केलेले शक्तिप्रदर्शन आणि आसपासच्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात असलेल्या बंजारा समाजाच्या प्रभावामुळे भाजपनेही या प्रकरणात बोटचेपी भूमिका घेतलेली दिसते. 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live