डॉक्टर आरोळे पॅटर्नने कोरोना रुग्ण ठणठणीत बरे ....  ( पहा व्हिडिओ )

साम टीव्ही ब्युरो
सोमवार, 26 एप्रिल 2021

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील डॉक्टर रवी आरोळे यांनी कोरोनावर यशस्वी उपचार शोधून काढला आहे. आणि तो एक कमी खर्चात. डॉक्टर आरोळे यांच्या आरोळे पॅटर्नची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. 

जामखेड : ना रेमेडिसवीर ना महागडे औषध. डॉक्टर आरोळे पॅटर्नने रुग्ण ठणठणीत बरे होत आहेत. आरोळे पॅटर्नने चार हजार Four Thousand रुग्णांनी  कोरोनावर Corona मत केली आहे. नगर Ahamanagar जिल्ह्यातल्या जामखेड Jamkhed मधल्या डॉक्टर रवी आरोळे यांचे जुलिया हॉस्पिटल Julia Hospital हे चर्चेचा विषय बनले आहे. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना रेमेडिसवीर दिले जात नाही. महागडी औषधे सुद्धा दिली जात नाहीत. तरीही या सेंटरमध्ये आलेला प्रत्येक रुग्ण हा लवकर कोरोनामुक्त आणि हमखास बरा होतो. Doctor Arole pattern healing Corona patients in Jamkhed 

डॉक्टर रवी आरोळे यांनी आयसीएमआर ICMR ने मान्यता दिलेल्या औषधांचा कोरोना उपचारात समावेश केलेला आहे. यामुळे रुग्ण लवकर कोरोनामुक्त होत आहेत.  आतापर्यंत त्यांनी तीन हजार सातशे रुग्णांना ठणठणीत बरे करून घरी पाठवले आहे. या कोविड सेंटरमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 0.६४ टक्के इतकी आहे. हि उपचार पद्धती सोपी आणि स्वस्त असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. याबाबद्दल डॉक्टर आरोळेंनी सांगितले कि, 'आजारांमध्ये पण फुफुसांवर सूज येते. तसेच गेल्या पन्नास वर्षापासून आपण वापरलेले स्टेरॉईड हे अत्यंत स्वस्त असतात. तसेच त्यांनी सांगितले की, रुग्णांना ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक देणे गरजेचे आहे'.

डॉक्टर आरोळे पॅटर्न यांचे कौतुक आमदार रोहित पवार यांनी देखील केले आहे. रोहित पवार म्हणले की, 1 ते 2 टक्के लोकांना रेमेडिसवीर महत्त्वाचे असले तरी 98 टक्के लोक दुसऱ्या औषधाचा चांगला प्रयोग करून बरे होतात. याबद्दल विचार करून औषध तयार केले पाहिजे' असे म्हणत त्यांनी जामखेडमध्ये होणाऱ्या या प्रयोगाचे कौतुक केले. 

जामखेडचे डॉक्टर आरोळे, महाडचे डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांच्यासारख्या तज्ञांनी कोरोनावर उपचार पद्धती विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट होत असताना या देवदूतांने केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. 

Edited by- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live