बीडमध्ये डाॅक्टरला पोलिसांकडून मारहाण

विनोद जिरे
गुरुवार, 6 मे 2021

बीडमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टरला, पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामध्ये डॉक्टरला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बीड : बीडमध्ये Beed प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टरला Doctor, पोलिसांनी Police अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामध्ये डॉक्टरला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉ.विशाल वनवे असं मारहाण झालेल्या डॉक्टरचं नाव आहे. Doctor Beaten by Police  in Beed Medicos warn Strike

डॉ विशाल वनवे हे आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथे, प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतात. ते बीड शहरातील च-हाटा फाटा येथून येत असतांना, त्याठिकाणी असणाऱ्या पोलिसांनी,त्यांची कसलीच चौकशी न करता,ओळखपञ दाखवूनही त्यांना अमानुष मारहाण केलीय.

अमरावतीच्या ग्रामीण भागात कोरोनाचा स्फोट

तर या मारहाणीत डॉ वनवे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान मारहाण करणाऱ्या पोलिसांवर विरोधात, तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा.  अन्यथा आजपासून कामबंद आंदोलन पुकारण्यात येईल...असा इशारा वैद्यकीय संघटना गट अ यांनी दिला आहे.

हे देखिल पहा -

अकोल्यात डाॅक्टर संपावर
दरम्यान, अकोला Akola येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात कोविड कक्षात रुग्ण सेवा देणा-या १५०  इंटर्न डॉक्टरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन Strike पुकारले आहे. जोपर्यंत मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार होत नाही तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही,  अशी भूमिका इंटर्न डॉक्टरांनी घेतल्याने रुग्णसेवा प्रभावित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. Doctor Beaten by Police  in Beed Medicos warn Strike

आपला जीव धोक्यात घालून महामारीशी लढतांना रुग्ण सेवा देणा-या डॉक्टरांवर शासनाकडून मोठा अन्यायच होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड कक्षात मोठ्या प्रमाणात रुग्ण दैनंदिन भरती होत आहेत. त्यात या रुग्णांची सेवा देणा-या वैद्यकीय यंत्रणेतील डॉक्टरांना कुठल्याही सुविधा नसल्याने नाराजीचा सूर उटमत आहे. त्यामुळे या इंटर्न डॉक्टरांनी आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. एकाला एक न्याय व दुस-याला दुसरा ही भूमिका बदलवून आम्हालाही न्याय द्यावा अशी अपेक्षा इंटर्न डॉक्टरांनी केली आहे. 
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live