चांगभलं! डॉक्टरचं स्वागत असंच झालं पाहिजे, टाळ्यांच्या गजरात अगदी दिमाखात

ब्युरो रिपोर्ट
मंगळवार, 24 मार्च 2020

दिवसरात्र मेहनत करुन रुग्णांना बरं करणा-या डॉक्टरांची मेहनत सगळ्यांना दिसते आहे. .त्यामुळे त्यांचे मानावेत तितके उपकार कमी आहेत. अशातच एक अतिशय हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर आला आहे.

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत असून... देशात मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ माजलीय.... महाराष्ट्रात आतापर्यंत 101 जणांना कोरोनाची लागण झालीय... गेल्या चोवीस तासात तब्बल 27 कोरोना पॉझिटीव्ह आढळलेत... एकट्या मुंबईत छत्तीस कोरोनाबाधित असून हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे... तर पुण्यात कोरोनाचे 3 नवीन रुग्ण आणि साताऱ्यात एका रुग्णाची भर पडलीय.  भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून... कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडूव वारंवार घरीच राहण्याचं आवाहन करण्यात येतंय.

 

अशात एक चांगली बातमी समोर येते आहे. दिवसरात्र मेहनत करुन रुग्णांना बरं करणा-या डॉक्टरांची मेहनत सगळ्यांना दिसते आहे. .त्यामुळे त्यांचे मानावेत तितके उपकार कमी आहेत. अशातच एक अतिशय हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये डबलशिफ्ट करुन घरी परतलेल्या एका डॉक्टरचं टाळ्यांच्या गजरात दिमाखात स्वागत करत त्यांना धन्यवाद देण्याचा प्रयत्न लोकांनी केला केला.. लोकांच्या स्तुत्या आणि कौतुकास्पद कृतीने डॉक्टरही भारावून गेल्याचं पाहायला मिळालं. ज्या वेळी आपल्या बाईकवरुन हा डॉक्टर आपल्या घराकडे पोहोचला, त्यावेळी सगळ्यांना आपआपल्या खिडक्यांमधून घरामध्येच राहून जोरदार स्वागत केलं. 

सध्या डॉक्टरांवर प्रचंड ताण आले. अतिशय प्रामाणिकमध्ये ते देशाची सध्या सेवा करत आहेत. अशात त्यांचे मानावे तितके उपकार कमी आहेत. 

 

पाहा व्हिडीओ - 

 

 

 

आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार - TWEET

 

हेही वाचा - कस्तुरबामधील 12 रुग्णांना वाचवण्यात यश

 

doctor came back home people applause and gratitude

 


संबंधित बातम्या

Saam TV Live