पर्यावरणाचे आरोग्य जपणारे वृक्षप्रेमी गुजरे डॉक्टर

Dr. Santosh Gujare
Dr. Santosh Gujare

सोलापूर: मनुष्याच्या जीवनात झाडांना Trees खूप महत्त्वाचं स्थान आहे. सध्याच्या कोरोना काळात झाडांचं महत्त्व पुन्हा अधोरेखित झालं आहे. सोशल मिडीयावर Social Media तर झाडे लावा हा मौलिक सल्ला लोक एकमेकांना देत आहेत. कारण झाडं ही माणसाच्या तिन्ही मूलभूत गरजा पुरवणारं निसर्गाचं देणं आहे. याची जाण ठेवून केवळ वृक्षारोपण न करता वृक्षसंवर्धन Arboriculture, त्यांचे पालन, संरक्षण यासाठीही एक डॉक्टर प्रयत्न करत आहेत. ही कहाणी आहे संतोष गुजरे या डॉक्टरांची. Doctor Gujare taking care for the health of the environment

सोलापूर Solapur जिल्ह्यातल्या मोहोळ Mohol तालुक्यातील अनगर गावचे रहिवासी असलेले संतोष गुजरे हे पेशाने डॉक्टर आहेत. आपला प्रचंड व्यस्त असलेला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून ते पर्यावरणाचं आरोग्य जपण्यासाठी परिश्रम घेत आहेत. ४८ वर्षीय डॉ. संतोष गुजरे यांना वृक्षलागवडीची प्रचंड आवड आहे.

एमबीबीएस आणि डीएमआरई चे शिक्षण घेतल्यानंतर ते गेल्या २३ वर्षांपासून अहमदनगर AHMEDNAGAR येथे वैद्यकीय सेवा बजावत आहेत. त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण कोल्हापूर Kolhapur येथून पूर्ण केले आहे.

कोल्हापुरातील परिसर हा प्रचंड हिरवाईने नटलेला दिसतो. त्या निसर्गरम्य वातावरणामुळे त्यांना शिक्षणानंतर आपल्या गावी परत यावेसे वाटत नव्हते. पुढे त्यांनी अशीच हिरवाई आपल्या गावाकडे निर्माण करायचे असा चंग बांधला आणि सोलापूर गाठले. गावतच ओम नावाचे हॉस्पिटल Hospital सुरू करुन रुग्णांची सेवा चालू केली.

स्वतःच्या मुलीच्या जन्माचे स्वागत त्यांनी झाड लावून केलं. पुढे त्यांनी वृक्ष लागवडीचे चळवळ जणू हाती घेतली. दरवर्षी पावसाळ्यात झाडे लावू लागले. गेल्या पाच वर्षांत या वृक्षलागवड चळवळीला वेग दिला. यासाठी आपल्या उत्पन्नाचा काही भाग वृक्षलागवडीसाठी खर्च करू लागले. 

डॉक्टरांनी Doctor आपल्या मुलीच्या नामकरणातील आणि वाढदिवसाचा खर्च वृक्षलागवडीवर खर्च केला. आजही ते आपल्या घरातील कार्यक्रमाचा खर्च झाडांवर खर्च करतात. स्वत:च्या पैशातून त्यांनी झाडे खरेदी करून रस्त्याच्या कडेला जिथे जागा दिसेल तिथे झाडे लावली आहेत. झाडे जगावे यासाठी लोखंडी ट्रीची देखील व्यवस्था त्यांनी केली आहे. Doctor Gujare taking care for the health of the environment

झाडं जळू नये यासाठी त्यांनी टँकरने पाण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी त्यांनी लाखो रुपये खर्च केले. आज याच परिसरात बहुसंख्य झाडे डेरेदार पणे उभे आहेत. याचे श्रेय डॉक्टरांना जाते. 

अ.नगरसह आजूबाजूच्या पाच ते सहा गावातील नागरिकांनी डॉक्टरांनी चालवलेल्या या चळवळीमध्ये सहभाग नोंदवला आहे. गावातील मंदिर, शाळा, समाज मंदिर एवढंच नाही तर स्मशानभूमीत ही डॉक्टरांनी वृक्ष लागवड केली आहे.

दरम्यान डॉक्टर  काही  मित्रांनी वृक्षलागवडीच्या मोहिमेसाठी अधिक प्रमाणात झाडे उपलब्ध करून दिली. यातील काही झाडे रस्त्याच्या दुतर्फा लावली तर काही झाडे त्यांनी वृक्षप्रेमी लोकांना देऊन टाकले. पण तेही ते झाड लावणार आणि जगवणार या अटीवर. वृक्षलागवडीसाठी डॉक्टरांनी चिंच, वड, गुलमोहर आणि आंब्याची झाडे निवडली आहेत. कारण सावली देणारे आणि फळ देणारी झाडे लोक चांगली जपतात हा त्यांचा अनुभव आहे. डॉक्टरांचे झाडावरचं हे अफाट प्रेम पाहून त्यांच्या वाढदिवसाला आणि कार्यक्रमाला लोक झाडेच भेट म्हणून देतात.  Doctor Gujare taking care for the health of the environment

मागच्या वीस वर्षांपासून गुजरे डॉक्टरांनी चालवलेल्या या वृक्षलागवड आणि संवर्धन चळवळीमुळे सोलापूर जिल्ह्यात त्याची 'ट्री-मॅन' Tree Man म्हणून ओळख झाली आहे.

Edited By- Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com