मास्क वापरताय ना? मग ही बातमी वाचाच! मास्कमुळे खरंच ऑक्सिजन लेव्हल कमी होते?

साम टीव्ही
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020
  • मास्कमुळे खरंच ऑक्सिजन लेव्हल कमी होते?
  • मास्कबाबत संशोधकांची महत्त्वाची माहिती
  • मास्क वापरताय ना? मग ही बातमी वाचाच

आता बातमी तुमच्या-आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची. कोरोना आल्यापासून प्रत्येकजण मास्कचा वापर करतोय... पण याच मास्कमुळे ऑक्सिजनची लेव्हल कमी होत असल्याचं काहीजण सांगतात. मात्र यावर जगातील अनेक संशोधकांनी अभ्यास केला. त्यातून काय वास्तव समोर आलंय. पाहा-

कोरोनाचं संकट आल्यापासून संपूर्ण जगाचा चेहरा-मोहरा बदलून गेलाय. प्रत्येकांच्या तोंडावर मास्क लावला गेलाय. मात्र या मास्कच्या वापरामुळे ऑक्सिजन लेव्हल कमी होते अशीही चर्चा केली जातेय. मात्र याबाबत जागतिक पातळीवरील संशोधनातून काही निष्कर्ष हाती लागलेयत. जे मास्कबाबत भीती वाटणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

संशोधकांनी काही लोकांच्या ऑक्सिजन लेव्हलचा अभ्यास केला. काही तास विनामास्क ठेवून त्यांची ऑक्सिजन लेव्हल तपासली गेली आणि त्यानंतर त्याच लोकांना मास्क लावून काही तासांनी ऑक्सिजन लेव्हल चेक केली. तेव्हा या लोकांच्या ऑक्सिजन लेव्हलमध्ये कोणताही फरक पडला नसल्याचं दिसून आलं. त्याचप्रमाणे, लोकांची वॉकिंग टेस्टही करण्यात आली. मात्र वॉकिंग टेस्टनंतरही ऑक्सिजन लेव्हलमध्ये फार मोठे बदल होत नसल्याचं दिसून आलंय. मात्र, वॉकिंग करणं आरोग्यासाठी चांगलं असल्याचंही संशोधकांनी म्हटलंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live