पैशांमधून कोरोनाचा संसर्ग होतो?

साम टीव्ही
शनिवार, 6 जून 2020
  • पैशांमधून कोरोनाचा संसर्ग होतो का ?
  • नोटांमुळे होतो कोरोनाचा संसर्ग ?
  • व्यापाऱ्यांनी घेतला कोरोनाचा धसका 

पैशांमधून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती अनेकांना वाटतेय. मात्र, हे खरं आहे की खोटं, याचा खुलासा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं करावा, अशी विनंती व्यापारी संघटनेनं केलीय. तसं पत्रच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पाठवण्यात आलंय. 

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोच आहे. अशा स्थितीत नोटांमधून कोरोनाचा फैलाव होतो, अशी चर्चा आता सुरू झालीय. नोटा आणि पैशांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होतो, असं काही अभ्यासातून समोर आल्याचा दावा अनेक जण करतायत. तसे मेसेजही सोशल मीडियातून पसरवले जातायत. त्यामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण झालीय. आपले दररोजचे व्यवहार पैशांच्या माध्यमातूनच होत असतात. त्यातच जर पैशांमधून कोरोनाचा संसर्ग होत असेल तर करायचं काय, असा प्रश्नही अनेकांना पडलाय. नेमक्या याच प्रश्नाची धास्ती व्यापाऱ्यांनीही घेतलीय. व्यापाऱ्यांच्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कॅट या संघटनेनं थेट केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनाच पत्र पाठवून या संदर्भात विचारणा केलीय. 

पैशांची एक नोट अनेकांच्या हातात पडते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. केंद्र सरकारने याबाबत काही महत्त्वपूर्ण माहिती किंवा सूचना जारी कराव्यात. नोटांमार्फत खरंच कोरोनाचा संसर्ग होणार असेल तर त्यापासून वाचण्यासाठी कशाप्रकारच्या उपायोजना करता येऊ शकतात, याबाबत माहिती द्यावी, असं कॅटनं आपल्या पत्रात म्हटलंय. ही माहिती फक्त व्यापाऱ्यांसाठीच महत्त्वाची नाही तर देशभरातील सर्वसामान्य नागरिकांनादेखील या गोष्टीचा फायदा होईल. याशिवाय नोटांमार्फत कोरोनाचा संसर्ग होत असेल तर तो रोखता येईल, असंही कॅटनं पत्रात म्हटलंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live