रायगड पोलिस दलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या नव्या 24 वाहनांचे लोकार्पण

दिनेश पिसाट
सोमवार, 24 मे 2021

रायगड जिल्हा पोलिस दलास जिल्हा नियोजन समिती रायगड यांच्या निधीतून रायगड पोलीस दलाला नव्याने प्राप्त झालेल्या वाहनांचे आज पालकमंत्री आदिती तटकरे Aditi Tatkare यांच्या हस्ते  लोकार्पण करण्यात आले.

रायगड: रायगड Rairgad जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसविण्याबरोबरच जनतेच्या सुरक्षेची महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस Police दलाला अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने दलाच्या ताफ्यात आता नवीन अद्ययावत वाहने सामील झाली आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस दलात अत्यंत आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. रायगड जिल्हा पोलिस दलास जिल्हा नियोजन समिती रायगड यांच्या निधीतून रायगड पोलीस दलाला नव्याने प्राप्त झालेल्या वाहनांचे आज पालकमंत्री आदिती तटकरे Aditi Tatkare यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. Donation of 24 new vehicles introduced in the police force in Raigad 

हे देखील पहा -

जिल्हा नियोजन समितीच्या District Planning Committee माध्यमातून 14 चारचाकी वाहने व 10 दुचाकी गाड्या मिळालेल्या आहेत. या नवीन वाहनांचा वापर जिल्ह्यातील गुन्हे नियंत्रण , जनतेची मदत व सुरक्षेसाठी अधिक उपयोग होईल, पोलीस दलाच्या कामकाजाला या अद्ययावत व सुसज्ज वाहनांनी गती मिळेल असे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी सांगितले. व जिल्हा नियोजन च्या माध्यमातून निधी उपलब्द करून दिल्याबद्दल पोलीस अधीक्षक दुधे यांनी आभार मानले.  

बुलढाण्यात कोरोना नंतर म्युकर मायकोसिसने काढले डोके वर !

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पोलीस दलाला अधिक सक्षम व बळकट करण्यासाठी नवीन मिळालेली वाहने अधिक उपयुक्त ठरतील असे सांगितले. पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय येथे पार पडलेल्या कार्यक्रमास खा. सुनिल तटकरे,आ. महेंद्र दळवी, आ. भरत गोगावले, आ.महेंद्र थोरवे,  आ.अनिकेत तटकरे, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी,अलिबाग नगराध्यक्ष प्रशांत नाईक , मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, आदी उपस्थित होते.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live