अफवांवर विश्वास ठेऊ नका, सरकारी आदेशांची वाट पाहा

साम टीव्ही
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने सोशल मीडियावर अफवांचा बाजार चांगलाच गरम झालाय.

कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने सोशल मीडियावर अफवांचा बाजार चांगलाच गरम झालाय. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जवळपास प्रत्येक जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर होणार अशा अफवा उठू लागल्यात.

सरकारनं अमरावती जिल्हा आणि अकोला शहरात लॉकडाऊन जाहीर केलंय. राज्यातल्या कोरोनाप्रवण जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्यात. सरकारनं सामान्यांना पूर्वतयारी करता यावी यासाठी अगोदरच घोषणा केलीय. असं असताना काही समाजकंटक राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत लॉकडाऊन जाहीर करणार असल्याचे मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल केलेत. अशा कोणत्याही मॅसेजवर विश्वास ठेऊ नका असं आवाहन प्रशासनानं केलंय.

 लॉकडाऊन जर असेल तर सरकार आणि प्रशासन त्याची पूर्वसूचना तुम्हाला योग्य आणि अधिकृत माध्यमातून दिली जाईल. त्यामुळं व्हॉट्सऍप युनिव्हर्सिटीच्या संदेशांवर अवलंबून राहू नका. अफवांच्या जाळ्यात सापडू नका आणि अफवा पसरवण्याचं माध्यम बनू नका.

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live