आर्थर रोड तुरुंगातही करोना

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 8 मे 2020

तुरुंगातील बाधित कर्मचाऱ्यांना स्वतंत्र ठिकाणी हलवण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याच्या तुरुंग विभागानं दिली.राज्यात करोनाचे रुग्ण आढळल्यानंतर तुरुंगातील कैद्यांना करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सरकारनं मोठं पाऊल उचललं. राज्यभरातील तुरुंगांमधील शेकडो कच्च्या कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले

 

मुंबई: तुरुंगातील ७२ कैद्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर तुरुंगातील २६ कर्मचारीही बाधित झाले आहेत. त्यामुळं खळबळ उडाली आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच, आता या विषाणूनं मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातही शिरकाव केला आहे. 

तुरुंगातील बाधित कर्मचाऱ्यांना स्वतंत्र ठिकाणी हलवण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याच्या तुरुंग विभागानं दिली.राज्यात करोनाचे रुग्ण आढळल्यानंतर तुरुंगातील कैद्यांना करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सरकारनं मोठं पाऊल उचललं. राज्यभरातील तुरुंगांमधील शेकडो कच्च्या कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले. तुरुंगांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचंही पालन काटेकोर होईल याकडं विशेष लक्ष दिलं जात आहे. मात्र, मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात करोनानं शिरकाव केला. या तुरुंगातील ७२ कैद्यांसह २६ कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं चाचणी अहवालातून स्पष्ट झालं आहे. या सर्व बाधितांना उद्या एका विशेष वाहनातून जीटी रुग्णालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.

WebTittle ::  Don't go to Arthur Road Prison


  


संबंधित बातम्या

Saam TV Live