गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! पॅनिक नका होऊ, उभारु गुढी सोशल डिस्टन्सिंगची

सिद्धेश सावंत
बुधवार, 25 मार्च 2020

भाजी घ्यायला, दूध आणायला, किंवा इतर कुठल्याही कामासाठी रोजच्या रोज बाहेर पडणं सगळ्यात आधी टाळलं पाहिजे. महाराष्ट्रातील तमाम जनतेला आम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून घरीच थांबण्याचं आवाहन करतो आहोत.

मुंबई - संपूर्ण देशात संचारबंदी लागू झाली आहे. कुणीही घराबाहेर पडू नये, असं आवाहन वेळोवेळी केलं जात आहे. मात्र संचारबंदीनंतर गोंधळ उडालेल्या लोकांनी चिंता करण्याचं कारण नाही. लगेच किराणी भरण्यासाठी दुकानात जाऊ नका. परिस्थितीला आता शांतपणे सामोरं जाण्याची गरज आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु राहणार असल्याचं महाराष्ट्र राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लोकांनी घरातच थांबणं गरजेचं आहे. यापुढे घराबाहेर पडणं, प्रत्येकासाठी धोकादायक ठरणार आहे, हे समजून घ्या. जबाबदारीने वागा आणि घरातच थांबा.

 

KEEP CALM & FIGHT AGAINST CORONA 

संचारबंदीच्या घोषणेनंतर लगेच डी-मार्ट आणि किराणा मालाच्या दुकानाकडे धाव घेणाऱ्या लोकांनी परिस्थितीचं गांभीर्य समजून घेण्याची गरज आहे. कुठेही गर्दी होणार नाही, याची आता आपण सगळ्यांनी काळजी घेण्याची नितांत गरज आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळेच आता आपल्याला कोरोनाला रोखता येणार आहे.

भाजी घ्यायला, दूध आणायला, किंवा इतर कुठल्याही कामासाठी रोजच्या रोज बाहेर पडणं सगळ्यात आधी टाळलं पाहिजे. महाराष्ट्रातील तमाम जनतेला आम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून घरीच थांबण्याचं आवाहन करतो आहोत.

 

6 महिने पुरेल इतका  अन्नसाठा - 

पुढील ६ महिने पुरेल इतरा अन्नधान्याचा साठा राज्याकडे आहे .
अशी माहिती अन्न आणि नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिलीय. संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहिल असंही त्यांनी सांगितलय. त्यामुळं अन्नधान्य खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी करु नका असं आवाहनही त्यांनी केलंय.

 

रुग्ण बरे होत आहेत - 

राज्यातील कोरोनाग्रस्त बरे होतायेत ही समाधानाची बाब आहे. आतापर्यंत 107 कोरोनाग्रस्तांपैकी अवघे 2 रूग्ण ICU मध्ये असून इतर रूग्णांची स्थिती सामान्य आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. राजेश टोपे यांनी फेसबुकवरून पत्रकार परिषद घेत ही माहिती दिलीय. कोरोनाबाधितांना माणुसकीनं वागवा. पुणे-मुंबईतील लोकांना गावात येण्यापासून रोखू नका असं आवाहनही राजेश टोपे यांनी केलंय. तसंच लोकांनी सूचनांचं पालन करावं असंही टोपे म्हणालेत. 

 

उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन - 

रस्त्यावर विनाकारण गर्दी करू नका असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय...सकाळी 8 ते 11 या वेळेतच भाजीपाला, आणि जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी लोकांनी बाहेर पडावं...तसंच घरातील एकाच व्यक्तीने बाहेर पडून वेळेत घरी परतावं असंही त्यांनी सांगितलंय...कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सगळ्यांनी सरकारला सहकार्य करावं, असंही आवाहन त्यांनी केलंय.

 

TWEET - 

 

 

सोशल डिस्टन्सिंगची गुढी - 

गुढी पाडव्याचा सण आज नागरिक साध्या पद्धतीने साजरा करतायेत. मुख्यमंत्र्यांनी देखील सर्वांना आपल्या कुटुंबीयांसोबत हा सण साजरा करण्याची विनंती केली आहे.असचं चित्र मालाडच्या एका घरात पाहिला मिळालं. पण यावेळी एका घरात मास्क घालून आणि social distancing पाळून गुढीची पुजा केली. 

 

TWEET -

 

 

हेही वाचा - कोरोनामुक्त झालेल्या पुण्यातील दाम्पत्याची पहिली प्रतिक्रिया सामवर EXCLUSIVE

 

dont panic keep calm and fight against corona covid 19 marathi aharashtra

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live