काळजी करू नका , कोरोनो म्हणजे काय हे जाणून घ्या 

काळजी करू नका , कोरोनो म्हणजे काय हे जाणून घ्या 

कोरोनो दोन प्रकारे पसरतो 


1. रूग्णाच्या खोकल्यातून 

रुग्ण खोकल्यावर हवेत तुषार उडतात

हे तुषार रुग्णाकडून हवेत पसरतात

या तुषारातील कणांमध्ये विषाणू असतात

आजूबाजूच्या व्यक्तींनी श्वास घेतल्यावर त्यातून त्याचा संसर्ग होतो.

2. वस्तूच्या स्पर्शातून  

रुग्णाच्या खोकल्यातून काही तुषार त्यातील विषाणूंसह आजूबाजूच्या वस्तूंवर पडतात

त्या वस्तूंना आपल्या हातांचा स्पशर् झाल्यावर ते विषाणू हातांना चिकटतात

त्यानंतर जर हात चेहर्याला किंवा नाकाला लावले तर ते आपल्या श्वसनमागार्तून जाऊन संसर्ग होतो.

हा आजार सामान्यतः सौम्य असतो. विशेषतः, मुले आणि तरुण प्रौढांसाठी; तसेच हा विषाणू वृद्ध व्यक्ती, उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेही व्यक्तींमध्ये गंभीर आजारास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे या संसर्गाचा त्यांच्यावर आणि निकटवर्तीयांवर होणाऱ्या परिणांमाविषयी जागरूक राहणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वतःचे, निकटवर्तीयांचे आणि समाजाचे संरक्षण करण्यासाठी काही सवयी व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यात सर्वांत प्रथम मुख्य म्हणजे नियमित आणि स्वच्छ हात धुणे आणि श्वसनासंबंधी आरोग्यदायी सवयींचा अवलंब करणे गरजेचे आहे. करोना आजाराच्या माहितीविषयी जागरूक राहा; तसेच स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या सल्ल्याचे अनुकरण करा. आजपर्यंत हा विषाणू रोखण्यासाठी किंवा उपचार करण्यासाठी कोणत्याही लसीचा शोध लागला नाही. विशिष्ट अँटिव्हायरल औषध उपलब्ध नाही. संभाव्य लस आणि काही विशिष्ट औषधोपचारांची चाचणी चालू आहे.  

धोकादायक लक्षणे 


१.तीव्र घसादुखी
२.38 अंशापेक्षा जास्त ताप असणे
३. धाप लागणे,छातीत दुखणे,खोकल्यावाटे रक्त पडणे,रक्तदाब कमी होणे,नखे निळसर काळी पडणे मुलांच्यामध्ये चिडचिड आणि झोपाळूपणा वाढणे

 हा आजार पसरण्याचा मुख्य मार्ग म्हणजे श्वासोच्छवास (ज्या व्यक्तीला हा आजार आहे, त्याच्या खोकल्यातून /शिंकण्यातून पडणाऱ्या थेंबातून पसरतो) त्यामुळेच कोणतीही लक्षणे नसलेल्या एखाद्या व्यक्तीकडून हा आजार पसरण्याचा धोका खूप कमी आहे.


 या आजाराला कारणीभूत विषाणू पृष्ठभागावर किती काळ टिकतो हे निश्चित नाही. अभ्यासानुसार करोना विषाणू काही तास किंवा कित्येक दिवस टिकून राहू शकतात. हे किती दिवस टिकून राहतील ही गोष्ट परिस्थितीनुसार भिन्न असू शकते. एखादा पृष्ठभाग संक्रमित झाला आहे, असे वाटत असेल, तर विषाणू नष्ट करण्यासाठी आणि स्वतःचे व इतराचे संरक्षण करण्यासाठी साध्या जंतुनाशकाने तो पृष्ठभाग साफ करा. आपले हात साबण आणि पाणी वापरून स्वच्छ धुवा. आपले डोळे, तोंड, किंवा नाक यांना स्पर्श करणे टाळा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
 
वृद्ध व्यक्ती आणि उच्च रक्तदाब, हृदयरोग किंवा मधुमेह यांसारखे दीर्घ मुदतीचे आजार असणाऱ्यांना गुंतागुंत होण्याची शक्यता असते. ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण असलेल्या लोकांनी तत्काळ वैद्यकीय उपचार घ्यावे.


जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) या विषाणूंच्या प्रतिबंधासाठी लस आणि औषधे विकसित करण्यासाठी क्लिनिकल चाचण्यांद्वारे आंतरराष्ट्रीय सहकार्यातून प्रयत्न करीत आहे. आपणास या आजाराची लक्षणे (विशेषतः खोकला) असतील किंवा संसर्ग झालेल्या आजारी व्यक्तीच्या संपर्कात आला असलात, तर मास्क घालणे आवश्यक आहे. डिस्पोजेबल मास्क फक्त एकदाच वापरला जाऊ शकतो. या मास्कची विल्हेवाह योग्य प्रकारे न केल्यास इतरांना धोका निर्माण होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने नागरिकांनी गरज नसेल, तर मास्कचा वापर करू नये, असा सल्ला दिला आहे.  अधिशियन कालावधी म्हणजे विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यापासून ते आजाराची लक्षणे दिसण्यापर्यंतचा काळ. हा कालावधी आजपर्यंतच्या अभ्यासावरून, साधारणपणे एक ते १४ दिवसांचा असतो. सर्वसाधारणपणे हा कालावधी पाच दिवसांचा असतो.

WebTittle :: Don't worry, know what Corono is

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com