घाबरु नका! जीवनावश्यक वस्तू 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्येही मिळत राहणार

सिद्धेश सावंत
मंगळवार, 24 मार्च 2020

गर्दी टाळण्यासाठी तुम्ही काही महत्त्वपूर्ण गोष्ट करु शकता. काय करावं आणि काय करायला नको?, हे आपण आपल्या साध्या कृतीतना आदर्श घालून घ्यायला हवा. कसं करावं आणि काय करावं?

नवी दिल्ली - लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर लोकांनी धास्ती घेतली आहे. 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये लोकांनी घरातच राहावं असं आवाहन मोदींनी केलं आहे. मात्र यावेळी लोकांना जीवनाश्य वस्तूंची काळजी करण्याची गरज नाही आहे. याबद्दल लोकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत. 21 दिवसांच्या या लॉकडाऊनच्या काळातही जीवनावश्यक वस्तू मिळत राहतील, त्यासाठी यंत्रणा सज्ज केली असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. 

 

21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या घोषणेमुळे लोकांमध्ये संभ्रम आहे. महाराष्ट्रात संचारबंदी केल्यानंतर भाज्यांच्या तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र भाजीपाल्याची, औषधांची, यांसारख्या जीवनावश्यक बाबींचा वाहतूक सुरु राहणार आहे. त्यामुळे कोणताही तुटवडा भासणार नाही, यासाठी सरकारकडून पूर्णपणे प्रयत्न केले जात आहेत. मात्र लोकांनी गोंधळून जाऊन या सगळ्याच्या खरेदीसाठी घराबाहेर पडून गर्दी करु नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. 

 

गर्दीमुळे कोरोना मोठ्या संख्येनं पसरतो. प्रगत देशात जे झालं, ते भारतात झाल्याच अनेक कुटुंब उद्ध्वस्त होती, असा मोदींनी आज देशाता संबोधित करताना म्हटलं आहे. यावेळी त्यांनी कोरोना आगीसारखा पसरतो असंही म्हटलं. त्यामुळे लोकांनाी घराबाहेर पडू नये, असंदेखील म्हटलं आहे. 

 

गर्दी टाळण्यासाठी तुम्ही काही महत्त्वपूर्ण गोष्ट करु शकता. काय करावं आणि काय करायला नको?, हे आपण आपल्या साध्या कृतीतना आदर्श घालून घ्यायला हवा. कसं करावं आणि काय करावं?

 • - आपल्या परिसरात स्वच्छता राखा
 • - दूध, भाजीपाल्याचा साठ करण्याची गरज नसली, तर या सगळ्याचा अनावश्यक वापर टाळा
 • - दुधाची पिशवी येत असेल तर दुधाची पिशवी आल्यानंतर ती किमान काहीवेळ पाण्यात ठेवा. प्लास्टिकवर विषाणू अनेकवेळ जिवंत राहू शकतात. असं केल्यानं प्लास्टिकच्या पिशवीवरील विषाणू रोखण्यास मदत होईल.
 • - एक जण जर बाजारात खरेदी करण्यासाठी जात असेल, तर त्याने किमान तीन ते चार कुटुंबांसाठीचा बाजार आणावा. चार जणांना बाहेर जाण्यापेक्षा एकाने बाहेर पडून जबाबदारीने सगळ्यांसाठी माणुसकी दाखवावी.
 • - स्वच्छता कर्मचारी, आपल्या सोसायटीमधील वॉचमेन यांना मदत करावी. त्यांच्यात जनजागृती करावी. 
 • - आपल्या परिसारत शक्यतो अनोळखी व्यक्ती शिरणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्यावी
 • - बाहेर पडताना मास्क किंवा रुमाल नक्की वापरा. मास्क नसल्यास रुमाल वापरा.
 • - एकमेकांशी बोलताना किमान अंतर राखा
 • - शक्यतो स्पर्श करणं टाळा
 • - कुणालाही कुठेही थुंकू देऊ नका आणि स्वतःही थुंकू नका
 • - अस्वच्छतेला जराही थारा देऊ नका.
 • - घाबरुन जाण्याची गरज नाही. 
 • - पोलिसांंना सहकार्य करा.

 महत्त्वाचं म्हणजे ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवा.

 

dont worry stay at home and follow these simple technics marathi to fight covid 19 corona maharashtra


संबंधित बातम्या

Saam TV Live