VIDEO | मंत्रालयातील दालन क्रमांक 602 नको रे बाबा

राजू सोनावणे
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

मंत्रालयातील दालन क्रमांक 602 नको रे बाबा .. कारण  602 या दालनाला सगळेच नेते शापित दालन म्हणून नकार देताना पाहायला मिळतात .. नेमकं या दालनात दडलयं तरी काय ?  

मंत्रालयाचा सहावा मजला नको रे बाबा...हे आम्ही म्हणत नाहीयोत... मंत्र्यांनी जी दालनं निवडलीएत त्यावरुन असं म्हटलं जातंय.... दालन क्रमांक 602... या दालनाचा इतिहासच असा आहे, की कुणालाच हे दालन नकोय... हा रिपोर्ट पाहा... या दालनाला मंत्री महोदय का घाबरतायत? याचा अंदाज येईल. मंत्रालयातील दालन क्रमांक 602... सहावा मजला... मुख्यमंत्र्यांच्या दालनाची ऊब.... समुद्राकडून येणारी गार हवा... तरीही कुणीच हे दालन स्वीकारायला तयार नाही... ठाकरे सरकारच्या सर्वच्या सर्व सहा मंत्र्यांनी हे दालन नाकारलंय.. आणि यामागचं कारण असू शकतंय... या दालनाचा कथित शापित इतिहास.अजित पवार उपमुख्यमंत्री होते. तेव्हा ते याच दालानात बसायचे. त्याचदरम्यान त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले आणि आघाडीची सत्ताही गेली.फडणवीसांचं सरकार आलं. एकनाथ खडसेंकडे सात खात्यांची जबाबदारी आली. ते याच दालनात बसले. पुढे त्यांच्यावर जमीन गैरव्यवहाराचे आरोप झाले. त्यांची गच्छंती झाली
 

 

Web Tittle : Don't you want to get the number 602 in the ministry?


संबंधित बातम्या

Saam TV Live