डाॅ. अमोल कोल्हेंचा पायगुण राष्ट्रवादीसाठी लाभदायक

डी. के. वळसे पाटील
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

मंचर  : अभिनेते डाॅ. अमोल कोल्हे यांचा पायगुण राष्ट्रवादी काॅंग्रेसासाठी लाभदायक ठरला आहे. त्यांच्या स्वतःच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात सहापैकी पाच आमदार हे राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत. तसेच त्यांच्या प्रचारसभांचा धडाका पक्षासाठी राज्यात उपयुक्त ठरला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळेस कोल्हे हे शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले. शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी जिंकणे अशक्य बनले होते. मात्र कोल्हे यांनी मोदी लाटेतही विजय मिळवला. कोल्हे यांच्या लोकप्रियतेचा आणि वक्तृत्त्वाचा पक्षाने उपयोग करून घेतला. 

त्यांच्या नेतृत्त्वाखाली शिवस्वराज्य यात्रा राज्यात निघाली. तिला उत्तम प्रतिसाद मिळाला. नंतर विधानसभा निवडणुकीत शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासोबतीने कोल्हे यांच्या प्रचारसभांना प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादीचा प्रत्येक उमेदवार हा कोल्हे यांच्या सभेची मागणी करत होता. त्यांच्या सभा आणि तेथे मिळालेले विजय यांचे गुणोत्तर चांगले राहिले आहे. 

''जनतेचा कौल मान्यच आहे. परंतु विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही या वलग्नेला चोख प्रत्युत्तर महाराष्ट्रातील जनतेने दिले आहे. मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे पराभव हे सरकारच्या कामगिरीचे बोलके चित्र आहे. आदरणीय शरद पवार साहेबांच्या झंझावाताने "अब की बार 220 के पार" या दाव्याची धूळधाण केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कसं लढावं याचा आदर्श वस्तुपाठ पवारसाहेबांनी स्वतः दाखवून दिला. विशेषतः ग्रामीण भागातील तरुणाईने पवारसाहेबांवर जो विश्वास दाखवला त्याचं प्रत्यंतर निकालात दिसून येत आहे. आणि हीच भविष्यकाळात काय होणार याची चाहूल आहे.'' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 ते म्हणाले, "शिरूर लोकसभा मतदारसंघात 6 पैकी 5 आमदार निवडून आले याचा आनंद आहे. हे यश सर्व निवडून आलेल्या आमदारांच्या कष्टाचं, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे आहे. लोकसभा निवडणुकीत रंगीत तालीम झाली होती. त्याबरहुकूम विधानसभा निवडणुकीचे शिरूर लोकसभा मतदारसंघात चित्र दिसून येते. मतदारसंघातील मायबाप जनतेचे मी अंतःकरण पूर्वक आभार मानतो.

WebTittle:: Dr. Amol Kolhe's footprint is beneficial to the NCP

संबंधित बातम्या

Saam TV Live