डॉ. तेलतुंबडे पोलिसांसमोर हजर; चौकशीत सहकार्य करणार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे पुणे पोलिसांना तपासात सहकार्य करण्यासाठी हजर झाले आहेत. डॉ. तेलतुंबडे यांच्यावर बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप पुणे पोलिसांनी ठेवला आहे.

यापूर्वी त्यांना पोलिसांनी अटकही केली होती, मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत त्यांची अटक बेकायदेशीर ठरविली होती. त्यानंतर डॉ. तेलतुंबडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायालयाने त्यांना दिलासा देत 14 व 18 फेब्रुवारीला पुणे पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करण्यासाठी पोलिसांपुढे हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तेलतुंबडे आज सकाळी पुणे पोलिसांपुढे हजर झाले.

Web Title: Dr Anand Teltumbde appears before Pune police

संबंधित बातम्या

Saam TV Live