रेमडिसिवीरविना रुग्णांना जीवदान देणारा डॉ.बावस्कर पॅटर्न..(पहा व्हिडिओ)

दिनेस पिसाट
बुधवार, 21 एप्रिल 2021

विंचूदंशावरील उपचारांबाबत जागतिक नावलौकिक मिळवलेले डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी १३ महिन्यांपासून रेमडेसिविरचा एकदाही वापर न करता ६४० रुग्णांना बरे केले आहे. “ही वेळ पैसे कमावण्याची नाही, तर आपल्या ज्ञानाच्या आधारावर वैद्यकीय क्षेत्रात नवीन संशोधन देण्याची आहे,’' असे ते मानतात. 

विंचूदंशावरील उपचारांबाबत जागतिक नावलौकिक मिळवलेले डॉ. हिंमतराव बावस्कर Dr. Himmatrao Bawaskar यांनी १३ महिन्यांपासून रेमडेसिविरचा Remdisivr एकदाही वापर न करता ६४० रुग्णांना बरे केले आहे. “ही वेळ पैसे कमावण्याची नाही, तर आपल्या ज्ञानाच्या आधारावर वैद्यकीय क्षेत्रात नवीन संशोधन देण्याची आहे,’' असे ते मानतात. Dr. Bavaskar pattern to cure corona patients without remdesivir

याच ध्यासातून वयाची सत्तरी ओलांडली असताना, उच्च रक्तदाब High Blood Pressure व थायरॉइडसारखी सहव्याधी असताना डॉ. बावस्कर यांनी या महामारीत एकही दिवस रुग्णालय बंद न ठेवता महाडमधील Mahad त्यांच्या रुग्णालयात कोरोना Corona रुग्णांवरील यशस्वी उपचार सुरू ठेवले आहेत.

डिसेंबरमध्ये डॉ. बावस्करांनी अभ्यासाला सुरुवात केली. मार्चपर्यंत यावर प्रकाशित झालेली हजारो जर्नल्स वाचून काढली. गोवर आणि रुबेला Rubela या विषाणूंमधील ६०% अमोनो ॲसिड कोरोना विषाणूसारखेच असल्याचे त्यांना कळले. तेव्हा लस आली नव्हती, त्यामुळे स्वत:च्या बचावासाठी त्यांनी व त्यांच्या पत्नीने बीसीजी आणि एमएमआर या लसी घेऊन कोरोना रुग्णांवर त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू केले. त्यांच्या कुटुंबीयांनाही फिजिकल डिस्टन्स, मास्कची सक्ती, सातत्याने स्वच्छता आणि नाकात आयोडिनचे ड्रॉप यासह प्रतिकार शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपचार व प्रशिक्षण त्यांनी दिले. Dr. Bavaskar pattern to cure corona patients without remdesivir

डॉ. बावस्करांनी मास्क Face Mask, शील्ड आणि ग्लोव्हज यांचा उपयोग केला. बीसीजी आणि एमएमआर या लसी घेतलेल्या असल्याने लहान मुलांना हा संसर्ग होत नसल्याचे त्यांच्या अभ्यासात आढळले. त्यामुळे त्यांनी व त्यांच्या पत्नीने स्वत:च्या प्रतिबंधासाठी या लसी घेतल्या आणि रुग्णसेवा सुरू ठेवली. ना पीपीई किट वापरले ना रेमडेसिविर दिले.

ऑक्सिजनची Oxygen पातळी ६५% असताना डॉ. बावस्कर यांच्याकडे चालत आलेला हा रुग्ण. वैद्यकीय परिभाषेत हँपी आयपॉक्सिया म्हणतात. यास पालथे झोपून डॉ. बावस्कर यांनी स्टिरॉइड, ऑक्सिजन, अँटिव्हायरल आणि अँटी कोऑगुलंट याच्या उपचाराने त्याची ऑक्सिजनची पातळी ९५% पर्यंत वाढवली. Dr. Bavaskar pattern to cure corona patients without remdesivir

बावस्करांनी पत्नी डॉ. प्रमोदिनी यांच्यासोबत आतापर्यंत ६५० रुग्णांवर उपचार केले असून त्यापैकी फक्त ११ रुग्ण दगावले आहेत. तेदेखील उशिरा आल्याने उपचारास प्रतिसाद मिळाला नसल्याचे ते सांगतात.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live