श्रीलंकेत ड्रॅगनचा हस्तक्षेप, साइन बोर्डवर चिनी भाषेने घेतली जागा; वाचा सविस्तर

साम टीव्ही ब्युरो
शुक्रवार, 28 मे 2021

चिनी दूतावासाने या ट्विटद्वारे आणखी अनेक साइन बोर्डचे फोटो शेअर केले असून यामध्ये तमिळ भाषेचा समावेश आहे.

श्रीलंकेच्या (Sri Lanka) दोन सरकारी प्रकल्पांच्या साइन बोर्डवर, अधिकृत भाषा आणि दक्षिण भारतीय भाषा तमिळ (Tamil) हटविली गेली होती. त्यानंतर त्या बोर्डची जागा चिनी भाषा (China) मंदारिनने घेतली होती. नेपाळनंतर (Nepal) चीनने श्रीलंकेत आपले वर्चस्व वाढवण्यासाठी सांस्कृतिक हस्तक्षेप सुरू केला आहे. याच आठवड्यात, श्रीलंकेचे अॅटर्नी जनरल डप्पूला डी लिव्ह्रा यांनी सिंगला (श्रीलंकेची मूळ भाषा), मंदारिन आणि इंग्रजी साइन बोर्डचे अनावरण केले. यामुळे श्रीलंकेत दोन प्रकारचे विवाद होऊ लागले आहेत. (Dragon's intervention in Sri Lanka, sign board in Chinese language) 

डीएनए आधारित लसीमुळे कोरोना लढ्याला नवी आशा

पहिला म्हणजे या साइन बोर्डवर तामिळ ही श्रीलंकेची अधिकृत भाषा का नाही आणि दुसरा वाद म्हणजे यावर चिनी भाषा मंदारिन का समाविष्ट केली गेली आहे. हे श्रीलंकेच्या तीन अधिकृत भाषांच्या (सिंघाला, तामिळ आणि इंग्रजी) धोरणांच्या विरोधात आहे. जेव्हा चीनने अॅटर्नी जनरल विभागाकडे स्मार्ट लायब्ररी सादर केली तेव्हा हा वाद अधिकच मोठा झाला. या घटनेमुळे इंटरनेट माध्यमांवर विविध प्रकारच्या चर्चा रंगत आहेत.

तीव्र टीका झाल्यानंतर साइन बोर्ड काढून टाकण्यात आले. अ‍ॅटर्नी जनरल कार्यालयाने या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. तथापि, नुकसान रोखण्यासाठी चिनी दूतावासाने ट्विट केले की, "आम्ही जेव्ही इमारत साइटचे साइन बोर्ड त्रिभाषीय नियमांचे पालन करीत नसल्याचे पाहिले. आम्ही श्रीलंकेच्या तीनही अधिकृत भाषांचा आदर करतो. त्याचबरोबर आम्ही चिनी कंपन्यांना हे नियम पाळण्याचे आवाहन करतो''. (Dragon's intervention in Sri Lanka, sign board in Chinese language)

सरकार तुमच्या व्हॉट्अॅप मॅसेजवर नजर ठेवतंय का ?

चिनी दूतावासाने या ट्विटद्वारे आणखी अनेक साइन बोर्डचे फोटो शेअर केले असून यामध्ये तमिळ भाषेचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात अशीच आणखी एक घटना घडल्याचा वाद अजूनही संपलेला नाही. कोलंबो बंदरात सेंट्रल पार्क बनवित असलेल्या चिनी कंपनीने तेथील तमिळ भाषेच्या जागी मंदारिनची जागा घेतली. जेव्हा तमिळ गट आणि इंटरनेट माध्यमांमध्ये ही बाब लोकप्रिय झाली, तेव्हा कोलंबो प्रशासनाने सांगितले की, जुन्या साइन बोर्डाचे फोटो प्रसिद्ध झाले होतो.

Edited By : Pravin Dhamale

हे देखील पाहा


संबंधित बातम्या

Saam TV Live