तुळस, मसाला चहा प्या आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवा

tea.jpg
tea.jpg

कोरोना विषाणू व्हायरसनंतर Corona Virus आता देशात काली बुरशी Black Fungus आणि पांढऱ्या बुरशीचे White Fungus प्रकार वाढत आहेत. कमकुवत रोगप्रतिकारशक्ती Immunity  ही देखील  बूरशीच्या वाढीस कारणीभूत आहे. अशा परिस्थितीत टीव्ही आणि इतर सोशल मिडियाच्या Social media माध्यमातून रोगप्रतिकरशक्ति वाढविण्यासाठी अनेक पदार्थाच्या जाहिराती आपण पाहत असतो. मात्र घरच्या घरीच रोगप्रतिकारशक्ति वाढविण्याचे अनेक मार्ग आहेत. (Drink basil, masala tea and boost the immune system) 

यात आयुर्वेदिक काढा Ayurvedic extract आणि चहाचाही Tea यात समावेश होतो. खरतरं चहा मुळे आम्लपित्त, भूक मंदावणे अशा एक ना अनेक समस्या उद्भवतात. मात्र चहाचे काही प्रकार असे आहेत की जे तुमची रोग प्रतिकारशक्तीही वाढवू शकतात. तुळस Basil, अश्वगंधा Ashwagandha, मसाला चहा Masala tea  आणि लेमन-टी Lemon Tea यांसारखे  चहा तुमची रोगांविरूद्ध लढण्याची क्षमता वाढवते.

सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिसीनिकल अँड अ‍ॅरोमॅटिक प्लांट्स, लखनऊ येथील तज्ञ आशिष कुमार यांनी घरच्या घरी  आयुर्वेदिक चहा कसा बनवायचा याबाबत सांगितले आहे. इतकेच नव्हे तर त्याचे अनेक फायदेही सांगितले आहेत.

  • तुळशी चहा: कफ, खोकला, सर्दी आणि दम्यासाठी फायदेशीर

तुळशीची ताजी पाने, वाळलेली पाने किंवा पावडर देखील तुळशीच्या पानांचा चहा बनवण्यासाठी वापरता येतो.  तुळशीचा चहामुळे कफ, खोकला, सर्दी, दमा किंवा ब्राँकायटिसपासून आराम मिळतो. तुळशीच्या चहामध्ये कफ आणि श्लेष्मापासून मुक्त होणारे घटक असतात. तसेच, एंटीसेप्टिक, अँटीऑक्सिडंट आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म  असतात.

तुळशीचा चहा बनवण्यासाठी प्रथम एक ग्लास पाणी उकळा आणि त्यात तुळशीची 8 ते 10 पाने घाला. तुम्हाला हवे असल्यास थोडेसे आले आणि वेलची पूडदेखील घालू शकता. ते 10 मिनिटे उकळी येऊ द्या, नंतर गाळणीने गळून घ्या. त्यात हवे असल्यास मध किंवा लिंबाचा रस घाळून प्या. तुळस चहामध्ये दूध किंवा साखर घालू नका,  असे केल्यास त्यातील औषधी गुणधर्म कमी होतात.

  •   अश्वगंधा चहा: जळजळ आणि संक्रमण कमी करते

अश्वगंधा एक औषधी वनस्पती असून तिच्या मुळांचा उपयोग चहा बनवण्यासाठी केला जातो.  परंतु अलीकडच्या कळत अशवगंधाच्या पानांच्या चहाचे प्रचलन वाढले आहे. आयुर्वेदानुसार अश्वगंधाच्या मुळापासून किंवा पानातून बनविलेला चहा पिण्यामुळे रोगांविरूद्ध लढण्याची क्षमता बळकट होते.  अश्वगंधाच्या मुळात अँटीऑक्सिडंट, अँटीवेनम, अँटीइन्फ्लेमेटरी आणि अँटीट्यूमर गुणधर्म असतात.

अश्वगंधा चहा बनवण्यासाठी अश्वगंधा मुळ, मध आणि लिंबू आवश्यक आहे. एक ग्लास पाण्यात एक इंच लांब अश्वगंधाचे मूळ उकळा. पाणी उकळल्यावर ते एक कपात गाळून घ्या.  त्यात चवीनुसार एक चमचा मध आणि लिंबाचा रस घाला. अश्वगंधा चहा सर्व  लहान मुले, वृद्ध आणि स्त्रियांसाठी फायदेशीर आहे.

  • लिंबू चहा: डोकेदुखी, घसा खवखवणे आणि सूज दूर करते

लिंबाच्या चहामध्ये अँटीऑक्सिडेंट आढळतात. हे जळजळ, बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव करते. चहाची पाने, लिंबाचा रस आणि साखर मिसळून लिंबू-चहा तयार केला जातो. लिंबू केवळ चव वाढवतच नाही तर रंगही बदलतो. लिंबाच्या चहामध्ये व्हिटॅमिन-सी जास्त प्रमाणात असल्यामुळे रोगांशी लढण्याची आणि संसर्गाशी लढण्याची क्षमता वाढते. सर्दी, खोकला, डोकेदुखी आणि खोकला असल्यास लेमनती घेतल्यास आराम मिळतो. लिंबाच्या गवताच्या पानांपासूनही लिंलेमन-टी तयार करता येतो.

  • मसाला चहा: फंगल आणि बॅक्टेरियाचे संक्रमण प्रतिबंधित करते

जर आपल्याला चहाचा आवड असेल तर आपल्यासाठी मसाला चहा हा एक चांगला पर्याय आहे. मसाला चहा तुम्हाला निरोगू  ठेवेल आणि तुमची चहाची आवश्यकता देखील पूर्ण करेल. मसाला चहा बनवणे खूप सोपे आहे आपण चहाची पाने  आणि दुधाच्या उकळत्या पाण्यात मिरपूड, आले, तुळस, दालचिनी, छोटी वेलची, मोठी वेलची, लवंगा, जायफळ घालून मसाला चहा बनवू शकता.

Edited By- Anuradha Dhawade 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com