२ ते १८ वयोगटातील मुलांवर कोरोना लशीच्या चाचणीला मंजूरी

विहंग ठाकूर
गुरुवार, 13 मे 2021

देशात आता लहान मुलांवर कोरोनाविरोधी लशीची चाचणी सुरु होणार आहे. औषध महानियंत्रकांनी (DCGI) लहान मुलांवर कोव्हिडविरोधी लशीच्या चाचणीला मंजूरी दिली आहे. त्यानुसार भारत बायोटेक ५२५ निरोगी स्वयंसेवकांमध्ये चाचण्या घेणार आहे

नवी दिल्ली : देशात आता लहान मुलांवर Small Children कोरोनाविरोधी लशीची Corona Vaccine चाचणी Trials सुरु होणार आहे. औषध महानियंत्रकांनी (DCGI) लहान मुलांवर कोव्हिडविरोधी लशीच्या चाचणीला मंजूरी दिली आहे. त्यानुसार भारत बायोटेक ५२५ निरोगी स्वयंसेवकांमध्ये चाचण्या घेणार आहे. Drug Controller gives not to corona vaccine test on Small Children

हे देखिल पहा - 

‘कोव्हॅक्सीन’ Covaxine लस निर्माण करणारी कंपनी भारत बायोटेक Bharat Biotech २ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांवर लशीची चाचणी करणार आहे. गुरूवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. भारतात कोव्हिड-१९ च्या तिसऱ्या लाटेत Corona Third Wave लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाची लागण झाल्याचं प्रमाण वाढलंय. Drug Controller gives not to corona vaccine test on Small Children

लाॅकडाऊनच्या निर्बंधांमुळे वाशिममधले शेतकरी अडचणीत

पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक, दुसऱ्या लाटेत युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित झाला. आता  तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

कशी होणार लहान मुलांवर चाचणी?

·      २ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांवर लशीची चाचणी होणार
·      दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी
·      ५२५ स्वयंसेवकांवर केली जाणार चाचणी
·      ही लस स्नायूंमधून दिली जाणार आहे
·      लशीचे दोन डोस शून्य आणि २८ व्या दिवशी दिले जाणार आहेत

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live