जातपंचायतीच्या जाचामुळे ७ बहिणींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा.. 

संजय तुमराम
सोमवार, 7 जून 2021

जातपंचायतीच्या जाचामुळे सात बहिणींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ आली.  हा धक्कादायक प्रकार चंद्रपूर शहरात घडली आहे. चंद्रपूर शहरातील भंगाराम वॉर्ड येथील ही घटना आहे

चंद्रपूर : जातपंचायतीच्या जाचामुळे सात बहिणींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ आली.  हा धक्कादायक प्रकार चंद्रपूर Chandrapur शहरात City घडली आहे. चंद्रपूर शहरातील भंगाराम वॉर्ड येथील ही घटना आहे. या परिसरात राहणाऱ्या प्रकाश ओगले यांचं दीर्घ आजारानं निधन झाले आहे. Due to caste panchayat harassment 7 sisters gave shoulder to father body

प्रकाश ओगले यांच्या मृत्यूचा निरोप नातलगांना देण्यात आले. मात्र, काही तासातच Hours गेल्या १५ वर्षांपासून प्रकाश ओगले भोगत असलेला जात पंचायतीचा Caste Panchayat बहिष्कार पुन्हा एकदा आड आला. गोंधळी समाजामधील प्रकाश ओगले यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. पदरी ७ मुली आणि २ मुलं. त्यामुळे त्यांना समाजातील लग्न-समारंभ, सामाजिक कार्यक्रम यांना जाणं शक्य होत नव्हतं.

पुतण्याने केला सख्या काकाचा खून, वाचा सविस्तर...  

त्यामुळे समाजाने त्यांच्यावर बहिष्कार Boycott टाकला होता. आर्थिक दंड ठोठावला होता. हा दंड मात्र, प्रकाश ओगले यांनी भरला नाही आणि हा बहिष्कार त्यांच्या मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतरही कायम राहिला. मात्र, MPSC ची तयारी करणाऱ्या त्यांच्या जयश्री या मुलीने जात पंचायतीला सणसणीत चपराक लागावत, आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याचा निर्णय घेतला आहे. Due to caste panchayat harassment 7 sisters gave shoulder to father body

हे देखील पहा 

गोंधळी समाजाच्या जात पंचायतीच्या या जाचाविरूद्ध काही सामाजिक कार्यकर्ते लढा देत आहेत. त्यांच्या मते, समाजातील गरिबांकडून पैसे लुबाडने, बहिष्कार टाकणे आणि त्यामाध्यमातून संपूर्ण समाजावर आपली दहशत बसविण्याचं काम जात पंचायत करीत आहे. सध्या विदर्भात ३५ कुटुंबं अशा प्रकारच्या जात पंचायतीचा बहिष्कार बोगत असल्याची बाब या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे आणली आहे.

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live