अतिवृष्टीमुळे कांद्याचे दर शंभरीपार, तर भाज्यांचे भावही कडाडले...वाचा काय आहेत सर्व भाज्यांचे दर

साम टीव्ही
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

ा पिकाचे प्रचंड नुकसान झालंय... त्यामुळे नवीन कांद्याचा हंगामही लांबणीवर पडलाय.. कांद्याची आवक न वाढल्यास हेच दर आणखी काही काळ टिकून राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.. दरम्यान कांद्याच्या किंमती कमी करण्याकरता, आयातीचे नियम केंद्राने शिथिल केलेत... खरिपात पिकलेला ३७ लाख टन कांदाही बाजारपेठेत येणार असून त्यामुळेही किमती कमी होण्यास मदत होईल, असा सरकारचा दावाय.

अतिवृष्टीचा फटका बसल्याने, कांदा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलाय. ऐन सणासुदीच्या काळात कांद्याचे दर वाढल्याने ग्राहकांचा खिसा आणखी रिकामा होणारय. गेल्या काही दिवसांपासून बाजारात मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक कमीय. त्यातच अतिवृष्टीमुळे कांद्याच्या पिकाचे प्रचंड नुकसान झालंय.

त्यामुळे नवीन कांद्याचा हंगामही लांबणीवर पडलाय. कांद्याची आवक न वाढल्यास हेच दर आणखी काही काळ टिकून राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान कांद्याच्या किंमती कमी करण्याकरता, आयातीचे नियम केंद्राने शिथिल केलेत. खरिपात पिकलेला ३७ लाख टन कांदाही बाजारपेठेत येणार असून त्यामुळेही किमती कमी होण्यास मदत होईल, असा सरकारचा दावा आहे.

कांद्याच्या दरवाढीपाठोपाठ आता भाज्याही महागल्या आहेत. कोरोनामुळे आर्थिक गणित बिघडलेले असताना, आता भाजीसाठी अधिक पैसे मोजण्याची वेळ सर्वसामान्यांवर आलीय. परतीच्या पावसात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने त्याची झळ शहरातील ग्राहकांना बसतेय.  पावसापूर्वीचे भाज्यांचे घाऊक दर आणि सध्याचे घाऊक दर यात बरीच मोठी तफावतय.

बाजारातील भाज्यांच्या सध्याचा दर पाहा काय आहे -