कोरोना लसीचा दूसरा डोस घेण्यासाठीचा कालावधी वाढला , पाहा दूसरा डोसचा कालावधी किती आहे.

सिद्धी चासकर
मंगळवार, 23 मार्च 2021

जगभरात सगळीकडे कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू आहे कोरोना लस ही दोन डोसांमध्ये दिली जाते पहीला डोस दिल्या नंतर दूसरा डोस हा 4 ते 6 आठवड्यांच्या दरम्यान घेतला जातो

जगभरात सगळीकडे कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू आहे कोरोना लस ही दोन डोसांमध्ये दिली जाते पहीला डोस दिल्या नंतर दूसरा डोस हा 4 ते 6 आठवड्यांच्या दरम्यान घेतला जातो मात्र आता लसीच्या दोन डोसमध्ये 6 ते 8 आठवड्यांच अंतर असणार आहे.

म्हणजेच दूसरा डोस हा दोन महिन्या नंतर घेण्यात येणार कोरोना लसीकरण वाढवण्याच कारण नक्की काय आहे हे स्पष्ट झालेलं नाही परंतू तज्ञांच्या म्हणण्या नुसार कोव्हिड -19 दूसरा डोसयाठी कालावधी मध्ये अंतर असायला लागतो त्यासाठी डोसमधील अंतर वाढविण्यात आलं असण्याची शक्यता आहे .

नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप ऑन ईम्यूनायजेशन (NTAGI) आणि नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन वॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फ़ॉर कोविड-19 या बैठकीत घेतलेल्या निर्णयानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला तसे करण्याचा सल्ला देण्यात आला.

या सल्ल्याचा विचार करत केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या पहिला डोस आणि दुसऱ्या डोसमधील अंतर 6 ते 8 आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्राने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live