कोरोना काळात गरीब विद्यार्थ्यांना मिळतेय 'प्रांगण' ची साथ...

During the Corona period poor students get the support of Prangan
During the Corona period poor students get the support of Prangan

डोंबिवली : भारतात कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या लाटेचा फटका सर्वच क्षेत्राला बसला असून, यात शिक्षण क्षेत्रही Education Department चांगलेच भरडले गेले आहे. कोरोनामुळे सुरु झालेल्या ऑनलाइन शिक्षणामुळे गरीब वर्गातील विद्यार्थ्यांचे भरपूर हाल होत आहे. अनेक गरीब कुटुंबाकडे स्मार्टफोन, मोबाइल रिचार्ज, शैक्षणिक साहित्य घेण्याचेही पैसे नसल्याने गरीब विद्यार्थी वर्ग शिक्षणापासून वंचित होत आहे. अशा गरीब, गरजू विद्यार्थ्यांची नाळ शिक्षणापासून तुटू नये, यासाठी प्रांगण फांऊडेशन Prangan Foundation संस्थेने पुढाकार घेतला आहे. During the Corona period poor students get the support of Prangan

या संस्थेच्या माधमातून गरीब वस्तीतील विद्यार्थ्यांना स्मार्टफोन उपलब्ध करून देणे, मोबाइलला रिचार्ज करून देणे, अन्नधान्य पुरवणे, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलणे असे नानाविविध उपक्रम हे प्रांगण फांऊडेशन ही मागील दोन वर्षापासून 'प्रोजेक्ट चंचलमन' या माध्यमातून करत आहे. 

 हे देखील पहा -

डोंबिवली Dombivali येथील ९ तरुण आणि त्यांच्या काही मित्रमंडळींनी मिळून २०१८ साली 'प्रांगण फांऊडेशन' संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला कल्याण-डोंबिवली येथील गरीब वस्त्यांमध्ये जाऊन अन्न पुरवत असत. तसेच दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याच्या उपक्रमाने संस्थेचा शुभारंभ केला होता. 

सध्या कोरोना काळात अनेक संकट आली असली, तरी संस्थेतील सदस्य तन-मन-धनाने गरीब विद्यार्थ्यांच्या मनात चैतन्य फुलवत आहे. कोरोना महामारीच्या या काळात या विद्यार्थी वर्गांला शिक्षण देण्याचे उल्लेखनीय काम करत आहे. या संस्थेचे १५० ते २०० सदस्य हे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास वर्ग, इंग्रजी शिकवणी घेण्यापासून शिक्षण साहित्य पुरवण्याचे काम मोठ्या जिद्दीने करत आहे. During the Corona period poor students get the support of Prangan

संस्थेमार्फत रावबत असलेल्या या उपक्रमाचा लाभ मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही माध्यमांचे विद्यार्थी घेत आहे. 'गरीब घरातील विद्यार्थी वर्ग स्पर्धामय युगात पुढे जावा. त्यांच्या मनातील इंग्रजीबद्दलचा न्यूडगंड नाहीसा व्हावा. कुटुंबाचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे, यासाठी 'प्रांगण' झटत असून तरुणांनी या उपक्रमात सहभागी होऊन समाजाला दिशा द्यावी, असे जाहीर प्रांगण फांऊडेशन आवाहन करत आहे. 

प्रांगण फांऊडेशन संस्थेने २०१८ साली सुरु केलेल्या 'प्रोजेक्ट चंचलमन' या उपक्रमातून गरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा मानस डोळ्यापुढे ठेवला होता. या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांची इंग्रजी बद्दलची भीती दूर झाली आहे. या उपक्रमात वैभव नरेंद्र पाटील, तन्मय मुलगुंड, अक्षय हंचाटे, चार्मी विच्छिवोरा, राहुल देशपांडे, आशीष पुजारी, स्वप्निल सरफरे, हेतवी विच्छिवोरा व सागरिका अय्यर या सदस्यांनी स्वयंसेवक म्हणून आजही यशस्वीपणे रावबत आहे.

Edited By- Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com