कोरोना काळात गरीब आदिवासींसाठी देव ठरले जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील त्रिमुर्ती डॉक्टर

दिनू गावित
सोमवार, 10 मे 2021

अतिशय तुटपुंज्या मनुष्य बळावर   रुग्णालय प्रशासनाने योग्य नियोजनाद्वारे तब्बल हजारो कोरोना बाधीतांना नवे जीवदान दिले. या रुग्णालयातील तीन डॉक्टरांनी पुढाकार घेत आपल्या आरोग्य सहकाऱयांच्या मदतीने वीस बेड पासुन सुरु केलेला प्रवास आता चारशे बेडवर पोहचला आहे.

नंदुरबार : आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या नंदुरबारची Nandurbar आरोग्य यंत्रना तशी जिल्हा सामान्य रुग्णालय भरवसेच. अतिशय तुटपुंज्या मनुष्य बळावर रुग्णालय प्रशासनाने योग्य नियोजनाद्वारे तब्बल हजारो कोरोना Corona बाधीतांना नवे जीवदान दिले. या रुग्णालयातील तीन डॉक्टरांनी Three Doctors पुढाकार घेत आपल्या आरोग्य सहकाऱयांच्या मदतीने वीस बेड पासुन सुरु केलेला प्रवास आता चारशे बेडवर पोहचला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील हि डॉक्टरांची त्रीमुर्ती खऱ्या अर्थाने अनेक रुग्णांसाठी जीवनदायी ठरली आहे. During the Corona period Three doctors became a god for the poor tribal at the District Rural Hospital

जिल्हा सामान्य रुग्णालयचा कारभार हाकणारे कारभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रघुनाथ भोय. तब्बल सात वर्षांपासुन जिल्हा सामान्य रुग्णालयाची धुरा पाहणाऱ्या डॉ रघुनाथ भोयेकडे तसे आरोग्य विभागाने बदलीसाठी लक्ष दिलेच नाही. मात्र त्याचाही फायदा नंदुरबारकरांनाच झाला. या डॉक्टरांनी नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयाला नवसंजीवनी देत त्याचा चांगलाच कायापालट केला. 
नुसत्या कोरोना काळाचा विचार करायचा झालच तर या रुग्णालयातील वीस बेडचा प्रवास आता दोनशे ऑक्सिजन व्हेंटीलेटर बेडवर आला आहे. शासकीय रुग्णलयात अद्यावत महिला रुग्णालय चे आज कोविड साठी वापरले जात आहे.

हे देखील पहा -

ब्लड बँक, आय हॉस्पीटल अशा किती तरी नव्या इमारती बांधण्याच काम यांच्याच कार्यकाळत झाले. राज्यात रेमडीसीवरचा तुटवडा असतांना नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात तो कधीच झाला नाही. इतकच काय तर ज्या ऑक्सिजन नर्स संकल्पेनेच राज्यभर कौतुक झाले ते याच डॉक्टरांच्या अभिनव संकल्पनेचा भाग आहे. नेहमीच काही तरी नवनवीन करुन रुग्णांना दिलासा देण्याचा डॉ रघुनाथ भोये यांचा मानस राहीला आहे. मार्च २० पासुन आजतागायत जिल्हा शल्य चिकित्सीकांना फक्त दिवाळी काळात घेतलेल्या चार रजा वगळता त्यांनी पुर्ण काळ जिल्हा सामान्य रुग्णालयातसाठीच झोकुन घेतला. त्यामुळेच त्यांच्या उत्तम नियोजनामुळे आज जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हीडसह सर्वच कारभार सुस्थितीत दिसुन येत आहे.

डॉ. भोयेंच्या खांद्याला खांदा लावुन आणखीन एक डॉक्टर नंदुरबारच्या रुग्णसेवेसाठी सतत झटतांना दिसले. ते म्हणजे अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के.डी सातपुते, आदिवासी बहुल भागात इतर आजारांसाठी रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्याच भरवश्यावर रहावे लागत असे. त्यामुळे कोरोना सांभाळून डॉ सातपुते यांनी इतर रुग्ण उपचारावर देखील विशेष लक्ष दिले. गरोदर माता बाळांतपण असो, वा कुपोषीत बालकांचे पुर्नवसन केंद्र या साऱया गोष्टीकडे या कार्यकाळत लक्ष देवुन त्यांच्यावर ऑक्सिजन नियोजनाची असलेली जबाबदारी डॉ सातपुते लिलया पार पाडली. सोबतच रक्त पिढीतील रक्त तुटवड्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न वाखळण्याजोगे आहे.

केंद्र सरकारच्या नुसत्या जाहिरातींनी कोरोना संपणार नाही - नवाब मलिक

कोरोना काळात नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयाचे इनचार्ज होते ते डॉ राजेश वसावे. आदिवासी बहुल भागातील गोरगरिब रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातुन सेवा देण्याची यांची धडपड नेहमीच राहीली. विशेष म्हणजे या सर्व कार्यकाळात त्यांच्या अर्धांगीनी देखील त्यांना सोडुन गेल्या. असे असताना कोरोनाची दाहकता लक्षात घेता, त्यांनी आपले दुःख सारुन जिल्हा सामान्य रुग्णलायातील रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला. डॉ राजेश वसावे यांनी वैद्यकीय उपचार केलेले आज शकडो रुग्ण घरी परतल्याने त्यांना आवर्जुन धन्यवाद ही देताना दिसुन येतात. During the Corona period Three doctors became a god for the poor tribal at the District Rural Hospital

आज नंदुरबारच्या विविध योजना राज्यात गाजत आहे. कधी कुपोषणासाठी कुप्रसिद्ध असलेला नंदुरबार जिल्हा आरोग्यातील विविध अभिनव योजनांसाठी आता राज्यात पथदर्शी ठरत आहे. या साऱ्यांचीच नीव ही जिल्हा शासकीय रुग्णालयातुन रचली जात आहे. मात्र हे सारे करताना या त्रिमुर्ती डॉक्टरांच्या हात बळकटीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अन्य शेकडो हातांची अमुल्य मदत कारगीर असल्याचे हे तीघेही आवर्जुन सांगतात. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रनेने न दमता न थकता कोरोणा काळात दाखवलेले हे स्पिरीट खऱया अर्थाने आरोग्य यंत्रनेला आलेली मरगळ झटकण्यास कारगीर ठरले.असे नेतृत्व उत्तम राहील्यास काय सकारात्मक बदल घडतो याचीच प्रचिती या तिन्ही त्रीमुर्ती डॉक्टरांनी घडवुन दिली आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live