दिल्ली हायकोर्टात सुनावणी वेळी अज्ञात व्यक्तीने गायले घुंगट कि आड से.....

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 जून 2021

अभिनेत्री चुही चावला हिने ५ जी रेडिएशनचा पर्यावरण आणि जीवसृष्टीवर परिणाम होत आहे. त्यामुळे ५ जी वर बंदी आणावी अशी मागणी करणारी याचिका तिने दिल्ली हायकोर्टात केली. जुही स्वतः या व्हर्च्युअल सुनावणीत सहभागी होती. या वेळी एका व्यक्तीने वर्चुअल सुनावणीच्या वेळी वातावरण फिल्मी बनवून टाकले . त्याने एक नाही तर चक्क तीन - तीन गाणी जुहीच्या चित्रपटाची गायली आणि मग आता कोर्टाचा संताप अनावर झाला .

दिल्ली - आपण चित्रपटामध्ये Movie कोर्टातील हिरो Hero आणि हिरोईनचे फिल्मी डायलॉग ऐकले असतील. पण सुनावणीवेळी चक्क कोर्टात Court कुणी गाण गायल्याच ऐकलंय का तसं ऐकिवात ही नसेल हो आणि हि घटना कोणत्या चित्रपटाची नाही. तर दिल्ली हायकोर्टातील Delhi High Court बुधवारच्या व्हर्चुअल सुनावणीतील आहे. दिल्ली हाय कोर्टात वर्चुअल सुनावणीत आभिनेत्री जुही चावल्याच्या Juhi Chawala ९० च्या काळातील हिंदी फिल्मची गाणी एका व्यक्तीने गायल्याची घटना घडली आहे. During the hearing in the Delhi High Court an unidentified person sang song

अभिनेत्री चुही चावला हिने ५ जी रेडिएशनचा पर्यावरण आणि जीवसृष्टीवर परिणाम होत आहे. त्यामुळे ५ जी वर बंदी आणावी अशी मागणी करणारी याचिका तिने दिल्ली हायकोर्टात केली. जुही स्वतः या व्हर्च्युअल सुनावणीत सहभागी होती. या वेळी एका व्यक्तीने वर्चुअल सुनावणीच्या वेळी वातावरण फिल्मी बनवून टाकले . त्याने एक नाही तर चक्क तीन - तीन गाणी जुहीच्या चित्रपटाची गायली आणि मग आता कोर्टाचा संताप अनावर झाला .

टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी विरोधात गुन्हा दाखल... 

या याचिकेवर कोर्टात वर्चुअल सुनावणी वेळी व्यत्यय आणण्याचा  प्रयत्न एका  अज्ञात  व्यक्तीने  केला . जुही चावलाचे घुंगट की आड में  दिलबर का.... हे १९९३ सालचे  हम  हे राही  प्यार के चे  गाणे  त्याने व्हर्चुअल  सुनावणीत गायले .  त्याच्या मुळे  कोर्टाच्या  सुनावणीत  व्यत्यय   आला होता . 

त्यानंतर १९९५ सालच्या नाजायज चित्रपटातील “लाल लाल होटो पे गोरी तेरा नाम है” हे गाणं म्हणून पुन्हा सुनावणी दरम्यान व्यत्यय आणला. त्यानंतर त्या व्यक्तीला त्या सुनावणीतून काढून टाकण्यात आलं. परंतु पुन्हा ती व्यक्ती व्हर्च्युअल सुनावणीत आली. पुन्हा आयना चित्रपटातील “मेरी बन्नो की आयेगी बारात” गाणं गायला सुरुवात केली. During the hearing in the Delhi High Court an unidentified person sang song

हे देखील पहा -

दिल्ली हायकोर्टाने याची दाखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. व्हर्चुअल बैठकीतील हा गाणं गाणारा कोण ते शोधण्यास सांगण्यात आले. त्या व्यक्तीवर न्यायालयाच्या अवमानना केल्याचा खटला चालवण्यात येईल.याबाबत कायदे तज्ज्ञांच मत जाणून घेतले. कोर्टातील या फिल्मी घटने नंतर कोर्टाच्या कामात व्यत्यय आणल्याबाबत कायदे तज्ज्ञांच मत जाणून घेतली . During the hearing in the Delhi High Court an unidentified person sang song

दरम्यान अभिनेत्री जूही चावलाच्या या अर्जांवर दिल्ली हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. ५ जी विरोधात अभिनेत्री जुही चावला हिच्या एन्ट्रीमुळे या याचिकेची चर्चा झाली. आता जुही चावला च्या फिल्म ची गाणी कोर्टाच्या वर्चुअल सुनावणीत एका व्यक्तीने गायल्याने तो हि चर्चेचा विषय ठरला आहे.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live