उत्तर भारतात थंडीचा कहर, थंडीमुळे ८ जणांचा मृत्यू

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

 

 

नवी दिल्लीः पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये गेल्या दहा दिवसांपासून थंडीची लाट पसरली आहे. या ठिकाणी तापमान ९ डिग्रीपर्यंत घसरले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी चार दिवस थंडीची लाट राहणार आहे. हरियाणात थंडीमुळे सरकारी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पंजाबमध्ये १५ जानेवारी नंतर शाळा उघडणार आहेत. चंदीगडमध्ये ३१ डिसेंबर पर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. दशकानंतर लोकांना अशा थंडीचा सामना करावा लागतोय. हिमाचल प्रदेशात प्रचंड थंडी आहे. दिल्लीत गुरूवारी सकाळी ५.८ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शहरात सकाळच्या वेळी धुके पसरले होते, अशी माहिती हवामान खात्यातील एका अधिकाऱ्यांने दिली आहे. धुके पसरल्याने २५ हून अधिक रेल्वे दोन तास ते सहा तास उशिराने धावत असल्याची माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

दोन दिवसांपासू या ठिकाणी जबरदस्त थंडी असून केवळ लुधियानात कमीत कमी ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर भारतात आणखी पाच दिवस कडाक्याची थंडी राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

 

 

देशाच्या इतर राज्यातही थंडी वाढणार आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दिल्ली, एनसीआर, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहारच्या अनेक शहरात थंडी वाढणार आहे. बुधवारी उत्तर भारतातील लखनऊ, बहराईच, चुरू, डिबरूगडमध्ये सकाळी साडेपाचच्या सुमारास प्रचंड धुके पसरले होते. तर पटियाला, चंदीगड, देहरादून, ग्वालियर मध्ये धुक्यामुळे काहीच दिसत नव्हते. बर्फवृष्टी आणि रामबनमध्ये झालेल्या भूस्खलमुळे बंद झालेला जम्मू-काश्मीरचा महामार्ग बुधवारी उघडण्यात आला होता. हा महामार्ग बंद झाल्याने या ठिकाणी जवळपास ४५०० वाहनांची वाहतूक कोंडी झाली होती.

 

Web Title : during the next 24 hours, cold day conditions will continue in northwest india
 


संबंधित बातम्या

Saam TV Live