लॉकडाऊन काळात आंतरजिल्हा आपत्कालीन प्रवासासाठी  ई-पास लागणार

E Pass
E Pass

मुंबई: कोविडचा Covid प्रसार महाराष्ट्रात Maharashtraपुन्हा वेगाने पसरत असताना प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध Restrictions लावले आहेत. शुक्रवारी राज्य पोलिसांनी आंतरराज्य आणि आंतरजिल्हा Interstate and interdistrict प्रवासासाठी "अत्यंत आपत्कालीन परिस्थिती"  ई-पास प्रणालीची व्यवस्था पुन्हा नव्याने सुरू केली आहे. E pass system to be implemented in Maharashtra During Lock Down

 कोविड १९ चा प्रसार महाराष्ट्रात वेगाने होत आहे. तो रोखण्यासाठी कडक निर्बंध लावून शुक्रवारी राज्य पोलिसांनी आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी आपत्कालीन परिस्थिती मध्ये प्रवासासाठी ई-पास प्रणालीची E pass system सुविधा सुरू केली आहे.

महाराष्ट्र सरकारने Maharashtra Government  जाहीर केलेल्या निर्बंधात प्रवासावर, कार्यालयात माणसांच्या उपस्थितीबाबत आणि लग्नाच्या कार्यक्रमांवर आणखी नवीन निर्बंध गुरुवारी रात्री लावण्यात आले. कोरोना विषाणू प्रकरणात प्रचंड प्रमाणात दुसरी लाट Second Wave असलेल्या राज्यात चौदा एप्रिलपासून आधीच कडक निर्बंध घातलेले गेले होते. परंतू बुधवारी नवीन नियम आणि अटी घालून संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आले.

महाराष्ट्रचे पोलिस महासंचालक DGP संजय पांडे Sanjay Pande म्हणाले आहेत का, 'आज शुक्रवारपासून ई-पास सिस्टमची नव्याने रचना करण्यात आली आहे, आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी नागरिकांनी त्याचा वापर करावा. लोकांना https: //covid19.mhpolice.in/ वर यासाठी अर्ज करावा लागेल. आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. आणि त्यांच्या अत्यंत आपत्कालीन प्रवास करावा लागत आहे त्या प्रवासाचे योग्य ते कारण तिथे नमूद करावे लागेल'. E pass system सुविधा सुरू केली आहे.

ज्यांना ऑनलाईन ई-पास सिस्टमचा प्रवेश नाही, ते मिळविण्यासाठी तुम्ही जवळच्या पोलिस ठाण्याला भेट देऊ शकतात. पोलिस ठाण्याचे कर्मचारी तुम्हाला तो फॉर्म भरण्यास आणि ई-पास काढून देण्यास मदत करतील. अशी पूर्ण माहिती त्यांनी लॉकडाऊन च्या काळात प्रवास करणाऱ्या जनतेला सांगितली. तसेच हि सुविधा केवळ आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी आणि वैयक्तिक वापरासाठी आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस जेव्हा इतर निर्बंध लागू झाले होते, तेव्हा उच्च पोलिस अधिकाऱ्यांनी ई-पासची कोणतीही तरतूद आपण करणार नसल्याचे सांगितले होते. परंतु आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना प्रवास परवानगी  संबंधी  देण्याच्या सूचना पोलीस कर्मचार्‍यांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले होते.  

परंतु सुरू असलेल्या निर्बंधांदरम्यान आपत्कालीन प्रवासासाठी अनेक लोकांनी विनंत्या केल्या आणि लोकांची आधीच प्रवासाची तिकिटे तयार असल्यामुळे पोलिसांनी लोकांच्या सोयीसाठी ई-पास सिस्टमचा पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. असे सांगण्यात आले. E pass system सुविधा सुरू केली आहे.

मागील वर्षी देशभरात पहिल्या लॉकडाऊन दरम्यान, सर्व आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवांसाठी ई-पास  प्रणाली लागू केली गेली होती, ज्यात पोलिसांनी प्रवाश्यांसाठी लाखो पास जारी केले होते. तसेच अलीकडेच मुंबई पोलिसांनी अत्यावश्यक सेवा वाहनांसाठी कलर-कोडेड स्टीकर देण्याची प्रणाली सुरू केली आहे.

महाराष्ट्रात गुरुवारी 67,013 नवीन कोरोना संसर्ग बाधितांची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. परिणामी आत्तापर्यंत एकूण बाधितांची संख्या तब्बल 40,94,840 च्या घरात जाऊन पोहोचली आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत राज्यात कोरोनामुळे मृतांची संख्या 62,479 इतकी होती. 

Edited By- Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com